(फोटो सौजन्य: Pinterest)
प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
यकृताबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याला स्वतःचे पुनर्निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजेच, यकृताचा काही भाग खराब झाल्यास तो कापून टाकावा लागतो, पण काही दिवसांनी तो भाग पुन्हा तयार होतो. अशा अनेक उपचारांची उदाहरणे आपल्या समोर आहेत ज्यात यकृताचा काही भाग कापला गेला आहे आणि काही महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या निदर्शनास आले आहे की कापला गेलेला यकृत पुन्हा पूर्ववत झाला असून शरीरातील महत्त्वाची कामे देखील अगदी चोखरित्या सांभाळत आहे.
आता पुनर्निर्माण म्हणजे काय? उदाहरणार्थ, जसं पालीला धोका निर्माण झाला की ती स्वतःची शेपटी गाळते आणि नंतर नवीन शेपटी येते, त्याचप्रमाणे मानवी यकृतालाही पुन्हा वाढण्याची क्षमता असते. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका कक्कड इब्राहिम हिच्या बाबतीतही असंच घडलं. मे 2025 मध्ये तिच्या यकृतात ट्यूमर असल्याचं निदान झालं. तिला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर होता. जूनमध्ये सर्जरी करून तिच्या यकृताचा 22% भाग काढण्यात आला. सुदैवाने कॅन्सर लिव्हरच्या बाहेर पसरला नव्हता, त्यामुळे सर्जरीनंतर उपचार यशस्वी ठरले.
डॉक्टर सांगतात की एखाद्या निरोगी व्यक्तीचा लिव्हर 6 ते 8 आठवड्यांत 70-80% पर्यंत वाढतो, आणि पुढील 3 ते 6 महिन्यांत पूर्णपणे पूर्ववत होतो. यकृत पुन्हा वाढण्याचा वेग आहार, वय आणि जीवनशैलीवर अवलंबून असतो. या काळात धूम्रपान व मद्यपान टाळून, दाळी, पनीर, अंडी, मासे यांसारखा प्रोटीनयुक्त आणि घरचा हलका आहार घेतल्यास लिव्हर लवकर बरा होतो. योग्य काळजी घेतल्यास काही महिन्यांतच व्यक्ती पुन्हा सामान्य जीवनशैलीत परतू शकते. एकंदरीत, पथ्य पाळणे महत्वाचे!
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






