Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंजीरच्या पाण्याचे आहेत अफलातून फायदे, पुरूषांना होईल उपाशीपोटी पिण्याचा फायदा

Fig Water Benefits: जर तुम्ही रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायले तर तुम्हाला एकच नाही तर अनेक फायदे होतील, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. अंजीर हे असं फळ आहे जे नुसते खाल्लं तरी फायदे मिळतात आणि अंजीरचे पाणी पिण्यानेदेखील अनेक फायदे मिळतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 10, 2024 | 03:57 PM
अंजीर पाणी पिण्याने नक्की काय फायदे मिळतात

अंजीर पाणी पिण्याने नक्की काय फायदे मिळतात

Follow Us
Close
Follow Us:

सकाळची निरोगी सुरुवात तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. असे बरेच पदार्थ आहेत जे सकाळी रिकाम्या पोटी  खाल्ल्याने आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. तुमचे आरोग्य या पदार्थांच्या सेवनाने सुधारू शकते. अंजीरदेखील त्यापैकी एक आहे. 

जर तुम्ही रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायलात किंवा तुम्ही रिकाम्या पोटी अंजीर खात दिवसाची सुरूवात केली तर तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतील. अनेक डॉक्टरही रोज 2 भिजवलेले अंजीर खाण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या अंजीरचे पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे (फोटो सौजन्य – iStock) 

फायबरचा उत्तम स्रोत 

अंजीर खाण्याचे नक्की फायदे काय आहेत

अंजीरच्या पाण्यात भरपूर फायबर असून याला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर जे पचनसंस्थेसाठी चांगले ठरते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. तसंच फायबर जास्त प्रमाणात असल्याने तुम्हाला भूक लवकर लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्याचे कामही अंजीर चांगले करते. 

हेदेखील वाचा – ‘ही’ गोष्ट रात्री दुधात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे

हृदय राहते चांगले

हृदय भक्कम करण्यासाठी अंजीर

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायले तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. अंजीर हे फायबर आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर अधिक चांगल्या पद्धतीने निरोगी राहण्यास मदत मिळते. 

वजन नियंत्रणासाठी 

वजन राहते नियंत्रणात

ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे अथवा वजनाचे व्यवस्थापन करायचे आहे त्यांच्यासाठी अंजीरचे पाणी खूप फायदेशीर ठरते. हे तुमचे चयापचय वाढवेल, जे वजन कमी करण्यास मदत करेल. तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात अंजीर पाण्याचा समावेश करून घ्या 

मधुमेहाची पातळी

पोषक तत्वांनी समृद्ध अंजीर रक्तातील साखरेची पातळी राखण्यासही मदत करते. असे मानले जाते की अंजीरचे पाणी प्यायल्याने टाइप-2 मधुमेहामध्ये ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्मूदी किंवा सॅलडमध्ये अंजीरही घालू शकता. अंजीरचे सेवन नियमित करणे मधुमेही रूग्णांसाठी अत्यंत उपयोगी ठरते असे डॉक्टरही सांगतात. 

हेदेखील वाचा – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित खा १ अंजीर, जाणून घ्या फायदे

पुरुषांचा स्टॅमिना 

पुरूषांचा स्टॅमिना वाढविण्यासाठीही अंजीर उपयोगी

याशिवाय ज्या पुरूषांना आपल्या शरीराचा स्टॅमिना वाढवायचा आहे, त्यांनी नियमितपणे पाण्याचे भिजवलेले अंजीर खावे अथवा अंजीराचे पाणी अशा पुरुषांनी नियमित पिण्याची सवय लाऊन घ्यावी. आठवड्याभरात पुरुषांमधील स्टॅमिना यामुळे नक्कीच वाढण्यास मदत मिळते आणि याशिवाय दिवसभर एनर्जी राहण्यास मदत मिळते. 

Web Title: Fig water benefits health tips when to drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका
1

सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं  शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला
2

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम
3

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही
4

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.