निरोगी त्वचेसाठी फॉलो करा हे स्किन केअर
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचेसाठी महिला सतत बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे त्वचा अधिककाळ सुंदर राहते. पण कालांतराने त्वचेसंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी कोणतेही स्किन केअर रुटीन फॉलो करण्याऐवजी त्वचेला सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर करावा. ज्यामुळे तुमची त्वचा कायम ग्लोइंग राहील. तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात, मात्र त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. दैनंदिन आहारात बदल करून विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी आहारात दही, ताक, विटामिन सी युक्त फळे, भाज्या, बिया, पालेभाज्या इत्यादी गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर न करता तुम्ही आहारात बदल करून त्वचा चमकदार आणि ग्लोइंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी कोणते स्किन केअर रुटीन फॉलो करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
त्वचेमधील ओलावा कमी झाल्यानंतर त्वचा अधिक ड्राय आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावरील त्वचा अधिक पांढरी आणि सुकलेली वाटते. त्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी टोनरचा वापर करावा. टोनर त्वचेमधील आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. याशिवाय त्वचा स्वच्छ करण्यासाठी सौम्य आणि हायड्रेटिंग क्लींझरचा वापर करावा. ज्यामुळे चेहरा कायम फ्रेश दिसेल.
त्वचेवर जमा झालेली मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रबचा वापर करावा. स्क्रबचा वापर करताना त्वचा हलक्या हाताने मसाज करावी. जास्त जोर लावून मसाज केल्यास त्वचेची गुणवत्ता खराब होईल. स्क्रब वापरताना शक्यतो ते घरगुती असावे, ज्यामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहचणार नाही. स्क्रब केल्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते.
त्वचा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवर टोनिंग करणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेचा नैसर्गिक पीएच संतुलित राहील. याशिवाय त्वचेमधील छिद्र घट्ट राहण्यास मदत होईल. मॉइश्चरायझर केल्यामुळे त्वचा अधिक मऊ आणि सॉफ्ट होते.
त्वचा हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी नियमित त्वचेला सूट होईल असे मॉइश्चरायझर लावावे. मॉइश्चरायझर लावताना त्वचेला कोणत्या प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा कायम फ्रेश आणि ओलसर दिसते.