Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

सध्याचे हवामान आणि खाण्यापिण्यातील बदल याचा सर्वात जास्त परिणाम हा त्वचेवर होत असतो. प्रदूषण आणि तणावाने त्वचा लवकर खराब होते. यासाठी नियमित त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, कसे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 24, 2026 | 06:35 PM
स्किन केअरची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

स्किन केअरची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • प्रदूषण आणि ताणापासून त्वचेची काळजी कशी घ्यावी 
  • त्वचेची नियमित काळजी घेणे गरजेचे आहे 
  • कशी काळजी घ्यावी जाणून घ्या 
अलीकडच्या काळात त्वचेशी संबंधित तक्रारींमध्ये लक्षणीयरित्या वाढ होत आहे. विशेषतः संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) ही समस्या लहानांपासून प्रौढांपर्यंत अनेकांना भेडसावत आहे. पूर्वी केवळ काही ठराविक लोकांपुरती मर्यादित असलेली ही समस्या आता सर्वसामान्य झाली आहे. 

प्रदूषणाची वाढती पातळी, वाढता ताणतणाव आणि त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांचा अतिवापर यामुळे भारतीयांमध्ये संवेदनशील त्वचेची समस्या वाढत आहे. प्रत्येकाने आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तिची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. शरीफा चौसे, त्वचारोगतज्ज्ञ, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे 

तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी

का वाढतेय त्वचेची समस्या 

संवेदनशील त्वचा ही आता दुर्मिळ समस्या राहिलेली नाही. यामध्ये त्वचेचा लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ होणे, त्वचेचा कोरडेपणा, घट्टपणा,खपलीयुक्त त्वचा आणि अचानक ब्रेकआउट्स सारख्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे, ज्यांना पूर्वी कधीही त्वचेची समस्या नव्हती अगदी अशा लोकांमध्येही ही समस्या वाढल्याचे दिसून येते. पूर्वी वापरत असलेल्या उत्पादनांवर अचानकच त्वचेची वेगळी प्रतिक्रिया दिसून येऊ शकते. 

काही लोकांना सूर्यप्रकाशात वावरताना किंवा चेहरा धुतल्यानंतर मुरुमे, पुरळ किंवा त्वचेची जळजळ जाणवते. म्हणूनच, त्वचेच्या काळजीवर लक्ष केंद्रित करण्याची आणि त्वचेची संवेदनशीलतेसारख्या समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. वायू प्रदूषणामुळे त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते. धूळ, धूर आणि हानिकारक कण त्वचेचे नुकसान करतात, ज्यामुळे त्वचा अधिक प्रतिक्रियाशील बनते. 

काय आहेत कारणे?

वाढता ताणतणाव, अनियमित झोप, हार्मोनल बदल,चुकीचा आहार, निर्जलीकरण, अतिनील किरणे, एक्झिमा आणि रोसेसिया सारख्या परिस्थिती आणि वाढत्या स्क्रीन टाईममुळे त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडतो. अनेक स्किनकेअर उत्पादनांची सवय, वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय वारंवार एक्सफोलिएशन केल्याने देखील त्वचेच्या संरक्षणात्मक थराचे नुकसान होते, ज्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. सुगंधित साबण, अल्कोहोल-आधारित टोनर आणि तज्ञांच्या सल्ल्याशिवाय वारंवार कॉस्मेटिक उपचारांचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान आणखी वाढू शकते.

सौम्य, वैद्यकीयदृष्ट्या चाचणी केलेल्या उत्पादनांचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान टाळता येते. त्वचेच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी, त्वचेची जळजळ दूर करण्यासाठी आणि कालांतराने सहनशीलता सुधारण्यासाठी योग्य स्किनकेअर दिनचर्येचे पालन करणे फायदेशीर ठरेल. स्वतःहून कोणत्याही रासायनिक उत्पादनांचा वापर करणे टाळा आणि तज्ज्ञांची मदत घ्या.

चेहऱ्यावर कायमच टिकून राहील तारुण्य! संत्र्याच्या सालींपासून घरीच तयार करा आयुर्वेदिक साबण, त्वचा होईल उजळदार

संवेदनशील त्वचेसाठी खालील स्किनकेअर टिप्स फॉलो करा

  • सौम्य, सुगंध-विरहीत क्लीन्झर वापरणे, त्वचेचा दुरुस्ती करण्यासाठी नियमितपणे ती मॉइश्चरायझ करणे
  • अतिनील किरणे आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी दररोज 50 पेक्षा जास्त SPF असलेले सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे
  • वारंवार त्वचेची उत्पादन बदलणे आणि जोरजोरात स्क्रब करणे टाळा, त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने उत्पादनांची निवड करा आणि तणावाचे व्यवस्थापन करा
  • दररोज पुरेशी झोप घ्या आणि त्वचा हायड्रेटेड राखा
  • वैद्यकीयदृष्ट्या चाचणी केलेल्या उत्पादनांचा वापर करा
  • बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त उत्पादनांची निवड करू नका जे त्वचेची संवेदनशीलता वाढवू शकतात
  • त्वचेवर कोणतेही उत्पादन लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरु नका आणि त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ यासारख्या लक्षणांच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या 
  • तुमच्या स्किनकेअरला रुटीनला प्राधान्य द्या आणि त्वचेची संवेदनशीलता व्यवस्थापित करा. स्किनकेअरवर विशेष लक्ष केंद्रित करा आणि त्वचेची संवेदनशीलता टाळा

Web Title: Pollution and stress make the skin more sensitive skin care must for everyone how to take care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • pollution
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
1

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
3

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून
4

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.