Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवीसाठी नाही तर या आजाराच्या उपचारासाठी बनवले गेले होते चाट! पदार्थाचा आंबट-गोड इतिहास जाणून घ्या

जिला पाहताच तोंडात पाणी सुटू लागते अशी चटपटीत चाट मुळातच कोणी असेल ज्याला आठवत नसावी. आंबट, गोड आणि चटपटीत अशी ही चाट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. मात्र या चाटचा शोध कशासाठी आणि कधी लावला गेला तुम्हाला माहिती आहे का? सम्राट शाहजहानशी संबंधित आहे इतिहास.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2024 | 11:58 AM
चवीसाठी नाही तर या आजाराच्या उपचारासाठी बनवले गेले होते चाट! पदार्थाचा आंबट-गोड इतिहास जाणून घ्या

चवीसाठी नाही तर या आजाराच्या उपचारासाठी बनवले गेले होते चाट! पदार्थाचा आंबट-गोड इतिहास जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

चाटचे नाव ऐकताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटायला लागते. पोट रिकामे असो वा भरलेले असो, लोकांना ते खायला आपोपाप पोटात जागा मिळते. देशातील प्रत्येक लहान-मोठ्या शहरांमध्ये, रस्त्याच्या कडेला, चौकात आणि बाजारपेठेत तुम्हाला त्याचे मोठमोठे आऊटलेट्स तसेच काही लहान स्टॉल्स पाहायला मिळतात, जे सतत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेले असतात, मात्र चाटची सुरुवात कुठून आणि कशी झाली? आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकांच्या जिभेवर ताव मारणाऱ्या या गोड-आंबट आणि चविष्ट चाटचा मुघल काळाशी संबंध आहे. ही डिश कुठली आणि तिचे नाव कसे पडले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

16 व्या शतकात पसरला होता हा रोग

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बाजारात मोठ्या आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या गोड, आंबट आणि मसालेदार चाटचे मूळ 16 व्या शतकात आहे. खरं तर मुघल सम्राट शाहजहान आणि त्याचे सैन्य यमुनेच्या तीरावर स्थिरावायला आले तेव्हा येथील पाण्यामुळे कॉलराचा आजार पसरला होता, जो लाखो प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हता.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी

अशी झाली चाट खाण्याची सुरुवात

अशा परिस्थितीत कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी, त्यावेळी एका वैद्यांनी शहाजहान यांना काही विशेष मसाल्यांच्या वापराबद्दल सांगितले, ज्यामुळे या संसर्गापासून आराम मिळू शकतो. अशाप्रकारे आंबट, गोड आणि मसालेदार चवीनुसार चिंच, औषधी वनस्पती, विविध प्रकारचे मसाले आणि धणे आणि पुदिना मिसळून तयार केलेली ही चाट दिल्लीतील अनेक लोकांनी खाल्ली.

या पदार्थाला चाट असे का म्हटले जाते

त्याकाळी लोक हे औषध किंवा विविध भारतीय मसाले आणि वनौषधींपासून बनवलेले पदार्थ चाटून खात असत. तसेच याची चव स्वतःच अनोखी आणि मसालेदार असल्याने लोक त्याला चाट असे म्हणू लागले. आज हा चटपटीत पदार्थ फक्त भारताच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियात सुप्रसिद्ध आहे.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या

विश्वकोश मानसओलसामध्ये उल्लेख आढळतो

अनेक इतिहासकार चाटला दही भल्लासोबतही जोडतात. 12 व्या शतकातील संस्कृत विश्वकोश मानसओलसामध्ये दही वडाचा उल्लेख आढळतो. कर्नाटकावर राज्य करणाऱ्या सोमेश्वर तिसऱ्याने ते लिहिले आहे. मानसओलसामध्ये वडा दूध, दही आणि पाण्यात बुडविण्याचा उल्लेख आहे. आज नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानपासून जगातील अनेक देशांमध्ये लोकांना या पदार्थाचे वेड लागले आहे.

Web Title: Chaat was made not for the taste but for treating this disease read an interesting history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 11:58 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.