यावर्षीचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. हिंदू धर्मातील हा एक पवित्र सण आहे जो दरवर्षी श्रवणानंतर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशाच्या आगमनाने जणू ही सर्व सृष्टी बहरून येते. या दिवसांत लोक बाप्पाची मनोभावनेने पूजा करतात आणि त्याचा पाहुणचार करतात. तसेच अनेकलोक या दिवसांत देशातील काही गणेश मंदिरांना भेट देतात आणि गणेशाचे दर्शन घेतात.
देशात गेणेशाचे अनेक सुप्रसिद्ध मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची आपली अशी पौराणिक कथा आणि महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका सुप्रसिद्ध मंदिराविषयी काही अनोख्या गोष्टी सांगणार आहोत. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराचे नाव आहे चिंतामण गणेश (Chintaman Ganpati) मंदिर. आज आम्ही तुम्हाला या मंदिराविषयीच्या काही रंजक गोष्टी आणि त्याचा इतिहास उलगडून सांगणार आहोत.
हेदेखील वाचा – सम्राट आणि राणीच्या स्मरणार्थ बांधला गेला ‘गेटवे ऑफ इंडिया’, अनोखा इतिहास माहिती आहे का? जाणून घ्या
चिंतामण मंदिराचा इतिहास फार जुना आणि रंजक आहे. या मंदिराच्य्या इतिहासाबाबत बोलायचे म्हटले तर हे मंदिर अवघे शंभर वर्षाहून जुने मंदिर आहे. हे पवित्र मंदिर 11व्या आणि 12व्या शतकाच्या आसपास परमार शासकांनी बांधले होते असे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर स्थानिक शहरासाठी तसेच संपूर्ण मध्यप्रदेशासाठी खूप खास मंदिर मानले जाते.
अनेक भाविकांद्वारे चिंतामण मंदिराची पौराणिक कथा सांगितली जाते. या पवित्र मंदिराबाबत भाविकांच्या दोन श्रद्धा आहेत.
पहिली – असे म्हटले जाते की, या पवित्र मंदिराच्या उभारणीसाठी भगवान गणेश स्वतः पृथ्वीवर अवतरले होते
दुसरी श्रद्धा- धार्मिक मान्यतेनुसार, चिंतामण गणेश मंदिराची स्थापना भगवान रामाने केली होती. लोककथेनुसार या मंदिराची स्थापना प्रभू रामाने वनवासात केली होती
हेदेखील वाचा – दोन राज्यात विभागले गेले आहे भारताचे हे रेल्वे स्टेशन, अमिताभ बच्चनच्या KBC मध्ये झाला खुलासा, वाचा सविस्तर
तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रमैत्रिणींसह चिंतामणी मंदिराला भेट द्यायला जाऊ शकता. येथे एक महाकाल मंदिरदेखील आहे. या महाकाल देवस्थानपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.चिंतामण मंदिर. हे मंदिर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 पर्यंत खुले असते. तसेच येथे दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले
जात नाही.
तुम्ही रेल्वे, हवाई तसेच रस्ता अशा तीनही मार्गांनी या मंदिराला भेट देऊ शकता.
रेल्वे – तुम्ही जर रेल्वेने जाण्याचा विचार करत असाल तर उज्जैन जंक्शन रेल्वे स्टेशन चिंतामण गणेश मंदिराजवळ आहे. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून तुम्ही टॅक्सी, कॅब किंवा ऑटोने मंदिरापर्यंत सहज पोहचू शकता. हे मंदिर रेल्वे स्टेशनपासून सात किमी अंतरावर आहे.
हवाई – चिंतामणी गणेश मंदिराच्या सर्वात जवळचे विमानतळ अहिल्याबाई होळकर विमानतळ आहे. विमानतळापासून मंदिराचे अंतर सुमारे 58 किमी आहे. तुम्ही विमानतळावरून टॅक्सी, कॅब किंवा ऑटोने सहज जाऊ शकता.
रस्ता – तुम्ही रस्त्याचा प्रवास करत तुमच्या गाडीने जाण्याचा विचार करत असाल तर देशाच्या कोणत्याही भागातून तुम्ही उज्जैनला पोहचू शकता.