गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 7 सप्टेंबर रोजी बाप्पा सर्वांच्या भेटीला येणार आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरता सर्वांना लागली असून आता सर्वत्र त्याच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. या दिवसांत खरा मान हा उकडीच्या मोदकांचा असतो. असे म्हणतात की, बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेत. त्यामळे बाप्पासाठी या दिवसांत उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो.
सध्या मोदकाचे अनेक प्रकारे आले आहेत जसे की, नारळाचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक मात्र आज आम्ही तुम्हाला एका हटके मोदकांची रेसिपी सांगत आहोत. आज आम्ही तुमच्यासोबत मूगडाळीच्या पौष्टिक मोदकांची रेसिपी शेअर करत आहोत. हे मोदक चवीला तर अप्रतिम असतातच शिवाय फार कमी वेळेत हे बनून तयार होतात. या गणेश चतुर्थीला काही नवीन करायचे पाहिजे असल्यास ही अनोखी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पहा.
हेदेखील वाचा – शुगर फ्री मिठाई हवी आहे? मग यंदाच्या गणपती उत्सवासात बनवा अंजीर बर्फी
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या मेजवानीत करा केसर भाताचा समावेश, आजच रेसिपी जाणून घ्या