Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2025: यंदाच्या होळीला घरीच बनवा रसाळ अन् कुरकुरीत जिलेबी; फार सोपी रेसिपी

होळीनिमित्त घरी एकदा नक्की बनवून पहा गोड जिलेबी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जिलेबी खायला फार आवडते, याची रसाळ आणि कुरकुरीत चव सर्वांना तिच्याकडे आकर्षित करते. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2025 | 10:49 AM
Holi 2025: यंदाच्या होळीला घरीच बनवा रसाळ अन् कुरकुरीत जिलेबी; फार सोपी रेसिपी

Holi 2025: यंदाच्या होळीला घरीच बनवा रसाळ अन् कुरकुरीत जिलेबी; फार सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

होळीचा सण आता जवळ आला आहे, घरोघरी यानिमित्त रुचकर पदार्थ तयार केलेजातात. आता सण म्हटलं की, गोडाचे पदार्थ आलेच. आजकाल बाजारात भरपूर भेसळयुक्त उत्पादने उपलब्ध असल्याने आरोग्यासाठी उत्तम दर्जाचे तेल किंवा तूप घरीच वापरणे चांगले. बाजारातील मिठाई आरोग्यास हानी पोहोचवू शकते. होळीनिमित्त घरी अनेक चवदार गोडाचे पदार्थ बनवले जातात, यातीलच एक म्हणजे कुरकुरीत जिलेबी.

आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी चविष्ट, रसाळ आणि कुरकुरीत जिलेबी घरी कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. सणानिमित्तची ही रेसिपी घरातील सर्वांनाच खुश करेल आणि सणाची मजाही द्विगुणित करेल. अनेक वेळा लोकांना रेस्टॉरंटसारखी जलेबी घरी बनवता येत नाही. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर आम्ही तुम्हाला घरी हलवाई स्टाइल जलेबी कशी बनवायची ते आज सांगणार आहोत. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Recipe: चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता शोधताय? मग झटपट घरी बनवा पालक-मूग डाळ डोसा

साहित्य

  • मैदा – 1/2 कप
  • सुती कापड
  • बेकिंग पावडर- 1/2 टेबलस्पून
  • दही – 1 टेबलस्पून
  • कॉर्न फ्लोअर – 1 टेबलस्पून
  • पाणी – 2 कप
  • पिवळा रंग – 1 चिमूटभर
  • देशी तूप – तळण्यासाठी
  • साखर – 2 कप
  • पाणी – 2 कप
  • वेलची पावडर- 1/2 टेबलस्पून
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हॉटेल स्टाईल ‘चवदार व्हाईट सॉस पास्ता’, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • हलवाई सारखी कुरकुरीत आणि रसाळ जिलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कॉर्न फ्लोअर, बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करा
  • यानंतर या मिश्रणात दही घालून चांगले मिसळा
  • हे द्रावण जास्त पातळ करू नका, कारण त्यामुळे चांगली जिलेबी बनत नाही
  • आता त्यात पिवळा अथवा केशरी रंग घालून मिक्स करा
  • नंतर सरबत तयार करण्यासाठी एका पातेल्यात 2 कप पाणी घालून उकळा
  • सरबत चांगले तयार झाल्यावर गॅस बंद करा
  • लक्षात ठेवा की जिलेबीचे पाक जास्त पातळ किंवा जास्त घट्टही व्हायला नको
  • यानंतर एका पातेल्यात तूप घालून गरम करा
  • आता तयार मिश्रण एका सुती कापडात ठेवून त्यात छिद्र करून हाताने दाब देऊन जिलेबीला आकार द्या
  • जिलेबी दोन्ही बाजूंनी शिजवून तुपात छान कुरकुरीत तळून घ्या
  • दोन्ही बाजूंनी शिजल्यावर जिलेबी बाहेर काढून साखरेच्या पाकात काही तास बुडवून ठेवा
  • यानंतर पाकमधून जिलेबी काढून गरमागरम सर्व्ह करा

Web Title: Holi 2025 know how to make cripsy sweet jalebi at home very easy recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • Holi 2025
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
1

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
2

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
3

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
4

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.