Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2025: रबरासारखी चिकट बनतेय साबुदाणा खिचडी? मग या टिप्स फॉलो करा; खिचडी बनेल मोकळी अन् चविष्ट

Khichdi Tips: शिवरात्रीनिमित्त तुम्हीही खिचडीचा बेत आखला असेल पण नेहमी खिचडी चिकट बनत असेल तर आजच यासाठीच्या काही सोप्या टिप्स फॉलो करा. या टिप्सच्या मदतीने तुम्ही झटपट मोकळी आणि चविष्ट अशी खिचडी बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2025 | 09:16 AM
Mahashivratri 2025: रबरासारखी चिकट बनतेय साबुदाणा खिचडी? मग या टिप्स फॉलो करा; खिचडी बनेल मोकळी अन् चविष्ट

Mahashivratri 2025: रबरासारखी चिकट बनतेय साबुदाणा खिचडी? मग या टिप्स फॉलो करा; खिचडी बनेल मोकळी अन् चविष्ट

Follow Us
Follow Us:

यंदा 26 फेब्रुवारी रोजी देशभर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हा दिवस संपूर्णपणे भगवान शिवाला समर्पित केला जातो. या दिवशी लोक व्रत-वैकल्य करत भगवान शिवाची पूजा करतात. याकाळात भगवान शिव पृथ्वीवर येऊन भाविकांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. अशात देशभरातील भाविक यादिवशी मनोभावनेने उपवास करतात आणि शिवाचे नाम जपतात. तुम्ही शिवभक्त असाल तर यावेळी उपवास करत असाल तर आजची ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते.

उपवास म्हटलं की, अनेक पदार्थ खाणे हे वर्ज्य असते. काही निवडक पदार्थ उपवासाला खाल्ले जातात. यातील उपवासाचा लोकप्रिय पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी. हा उपवासाचा पदार्थ असला तरी चवीला तो फार अप्रतिम लागतो ज्यामुळे अनेकजण हा पदार्थ उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवतात. मात्र अनेकांना ही खिचडी हवी तशी बनवता येत नाही. साबुदाण्याची खिचडी ही बनवायला सोपी असली तरी त्यासाठी आधीच साबुदाणे काही तास भिजत ठेवावे लागतात. अशात हे कमी भिजले किंवा जास्त भिजले तरी खिचडीची चव पूर्णपणे बिघडते. अनेकजण रात्रभर साबुदाणे भिजवतात आणि सकाळी याची खिचडी बनवू पाहतात पण यात पाणी अधिक झाले की याची खिचडी चिकट आणि वातड होते जी खायला अजिबात चांगली लागत नाही. परफेक्ट साबुदाणा खिचडीसाठी आज आमही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत याच्या मदतीने तुम्ही एकदम परफेक्ट मोकळी आणि चविष्ट अशी साबुदाणा खिचडी तयार करू शकता.

साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान

साबुदाणा खिचडी बनवताना फॉलो करा या टिप्स

  • यासाठी प्रथम साबुदाणे पाण्याने दोन-तीन वेळा चांगले धुवून घ्या
  • यानंतर साबुदाणे पाण्यात बुडतील इतके पाणी त्यात घाला
  • अर्ध्या तासाने यातील अतिरिक्त पाणी काढा आणि झाकण ठेवून ते 3-4 तास बाजूला ठेवून द्या
    अधिक पाणी साबुदाण्यांना चिकट बनवेल त्यामुळे त्यात ओलावा राहील इतकेच पाणी घाला
  • साबुदाणे भिजले की नाही हे तपासण्यासाठी एक साबुदाणा हाताने दाबून पहा तो मऊ असेल तर तुमचे साबुदाणे भिजले आहेत
  • साबुदाणा खिचडी कधीही मंद आचेवर झाकण ठेवून वाफेवर शिजवावी

साहित्य

  • 1 कप साबुदाणा
  • ½ कप शेंगदाण्याची कूट
  • 2 मध्यम बटाटे
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ
  • तेल
Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी होत आहे Viral

कृती

  • साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्या आणि मग मिक्सरमध्ये त्यांचा कूट करा
  • त्यांनतर मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट बनवा, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिरव्या मिरच्या कापूनही यात घालू शकता
  • बटाटे धुवून त्यांची साल काढा आणि मग याचे काप करा
  • सर्व साहित्य तयार झाले की मग आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात बटाट्याचे काप टाका आणि मंद आचेवर दोन-तीन मिनिटे परता
  • यानंतर यात मिरचीचे तुकडे अथवा पेस्ट टाका आणि पुन्हा काही मिनिटे परता
  • शेवटी यात भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घाला आणि चांगले मिक्स करा
  • वरून झाकण ठेवा आणि मंद आचेवर खिचडी 5-6 मिनिटे शिजवा
  • झाकण उघडून खिचडी व्यवस्थित हलवा आणि गॅस बंद करा
  • गरमा गरम खिचडी खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावर लिंबाचा रस देखील घालू शकता

Web Title: How to make perfect sabudana khichdi food tips recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • food recipe
  • Khichdi Recipe
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
4

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.