Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरलेल्या चपातीपासून बनवा रुचकर लाडू, झटपट रेसिपी नोट करा

चपाती हा आपल्या घरात बनवला जाणारा एक सामान्य पदार्थ आहे. अनेकांच्या घरात चपाती रोजच्या जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. अशात बऱ्याचदा जास्तीच्या चपात्या बनवल्या की त्या उरतात आणि मग या उरलेल्या चपात्यांचे दुसऱ्या दिवशी काय करावे ते सुचत नाही. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून स्वादिष्ट असे लाडू तयार करू शकता. हे लाडू आरोग्यासाठीही फार पौष्टिक ठरतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2024 | 12:50 PM
उरलेल्या चपातीपासून बनवा रुचकर लाडू, झटपट रेसिपी नोट करा

उरलेल्या चपातीपासून बनवा रुचकर लाडू, झटपट रेसिपी नोट करा

Follow Us
Close
Follow Us:

लाडू हा आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक गोडाचा पदार्थ आहे. लाडू कोणाला आवडत नाही. लाडू हा पदार्थ अनेक वेगवगेळ्या प्रकारे बनवला जातो. संसमारंभात, लग्नावेळी किंवा कोणत्या खास क्षणी घरात लाडू तयार केले जातात. लाडू बनवणे तसे थोडे अवघडच मात्र आज आमही तुमच्यासोबत लाडूची एक सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करत आहोत.

तुम्ही याआधी बेसनाचे, मेथीचे असे अनेक लाडू खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी उरलेल्या चपातीचे लाडू खाल्ले आहे का? नाही ना… मग आज बनवून पहा. चपाती हा आपल्या घरात बनवला जाणारा एक सामान्य पदार्थ आहे. अनेकदा ही चपाती जास्तीची बनते आणि दुसऱ्या दिवशी हिचे काय करावे ते सुचत नाही अशा वेळी तुम्ही यापासून रुचकर असे गोड लाडू तयार करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू आता घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी

साहित्य

  • उरलेल्या चपात्या
  • चमचा वेलची पावडर
  • एक चमचा भाजलेली खसखस
  • बेदाणे
  • साखर
  • तूप

हेदेखील वाचा – विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी ‘व्हेज सोया कीमा’, बनवण्याची परफेक्ट पद्धत जाणून घ्या

कृती

  • उरलेल्या चपातीचे लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम उरलेल्या चपात्या मिक्सरच्या भांड्यात टाकून यांचा चुरा करून घ्या
  • दुसरीकडे एका परातीत तूप आणि साखर टाकून फेटून घ्या
  • आता यात भाजलेली खसखस आणि बारीक करून घेतलेले चपातीचे मिश्रण टाका
  • मग यात बेदाणे टाका आणि सर्व साहित्य नीट एकजीव करून घ्या
  • आता या तयार मिश्रणाचे व्यवस्थित लाडू वळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे चपातीचे लाडू अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होतील

शिळी चपाती खाण्याचे फायदे

शिळी चपाती बीपीच्या रुग्णांसाठी फार फायद्याची मानली जाते. आजच्या धावपळीच्या आणि कामाच्या जगात अनेकांना बीपीचा त्रास होत असतो. त्यामुळे बरेच जण आपली बीपी कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की यावर रामबाण उपाय आहे उरलेली चपाती.

Web Title: Make instant leftover roti or chapati ladoo at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • Chapati

संबंधित बातम्या

मुलांसाठी कोणती चपाती आहे Best? गव्हाची नाही तर ‘या’ पिठाची चपाती ठरते उत्तम
1

मुलांसाठी कोणती चपाती आहे Best? गव्हाची नाही तर ‘या’ पिठाची चपाती ठरते उत्तम

शिळ्या पोळ्या फेकू नका; यांपासून तयार करा हे हटके टेस्टी पदार्थ; चव अशी की बोटं चाटत रहाल
2

शिळ्या पोळ्या फेकू नका; यांपासून तयार करा हे हटके टेस्टी पदार्थ; चव अशी की बोटं चाटत रहाल

मुलायम अशी पोळी तयार करायची आहे? मग पीठ मळताना ‘या’ दोन गोष्टी नक्की मिसळा
3

मुलायम अशी पोळी तयार करायची आहे? मग पीठ मळताना ‘या’ दोन गोष्टी नक्की मिसळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.