बेसन लाडू बनवण्याची सोपी कृती
घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बेसनाचे लाडू खूप आवडतात. बेसन लाडू प्रामुख्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि घरी कार्यक्रमांच्या वेळी बनवले जातात. बेसन लाडू बनवण्यासाठी सोपे असले तरीसुद्धा अनेकदा लाडू बनवताना छोट्या मोठ्या चुका या होतातच. अनेकदा लाडूचे पीठ खूप जास्त भाजले जाते, तर काही वेळ लाडूमध्ये तूप जास्त पडते इत्यादी अनेक चुका होतात. चवीला गोड लागणारे बेसन लाडू आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. बेसन लाडू बनवण्यासाठी चणा डाळीचा वापर केला जातो. तसेच बेसन लाडूचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लाडू बनवताना सर्वच महिला लाडूमध्ये ड्रायफूट टाकतात. त्यामुळे ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया बेसन लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)






