उरलेल्या चपातीपासून बनवा चायनीज स्टाइल नूडल्स, लहान मुलांच्या आवडीची रेसिपी
चपाती हा आपल्या रोजच्या जेवणातील एक अविभाज्य पदार्थ आहे. अनेकांच्या घरात रोजच्या जेवणात चपाती हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. आता बऱ्याचदा महिलावर्ग कोणाला जेवण कमी पडू नये या विचाराने जास्तीचे जेवण बनवतात आणि मग हे जेवण उरले की याचे काय करावे असा प्रश्न त्यांच्या मनात येतो. आता उरलेल्या चपातीपासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता मात्र आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचा पदार्थाची एक हटके रेसिपी सांगत आहोत.
लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही चायनीज पदार्थ खायला फार आवडतात. यातीलच एक प्रकार म्हणजे नूडल्स. हे नूडलस मौद्यापासून तयार केले जातात जे आरोग्यासाठी चांगले ठरत नाहीत. अशा वेळेस तुम्ही उरलेल्या चपातीपासून हेल्दी नूडल्स घरीच तयार करू शकता. असे केल्याने, तुमच्या उरलेल्या चपात्या वाया जाणार नाही आणि घरातील सदस्यही खुश होतील. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तंदूरी आलू, रेसिपीची चव चाखताच प्रत्येकजण होईल खुश
हेदेखील वाचा – कच्च्या केळीपासून बनवा हा टेस्टी स्नॅक्स, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रेसिपी