Recipe: तीच तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही कुरकुरीत भेंडी बनवून पहा
भेंडीची भाजी आपल्या घरातील एक सामान्य आणि नेहमी बनवली जाणारी भाजी आहे. आठवड्यातून एकदा तरी ही भाजी आपल्या घरी बनतेच. अनेकांना ही भाजी खायला आवडते तर काहींना आवडत नाही. तुम्हीही भेंडीची तीच तीच बोरिंग भाजी खाऊन कंटाळला असाल तर आजची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. भेंडी मुळातच आरोग्यासाठी फायदेकारक असते मात्र याचे अधिक सेवन करू नये कारण यातील बियांमुळे किडनी स्टोनचाही धोकाही तितकाच वाढत असतो. याचे प्रमाणात सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
आता तुम्ही भेंडीची भाजी तर अनेकदा खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी बेसन घालून केलेली कुरकुरीत भेंडी कधी ट्राय केली आहे का? ही रेसिपी चवीला फार अप्रतिम लागते, शिवाय फार कमी वेळेत बनून तयार देखील होते. तुम्ही जेवणात एक साइड डिश म्हणून देखील ही कुरकुरीत भेंडी तयार करू शकता. याची चव इतकी छान असते की, भेंडी न आवडणारा व्यक्तीही बोट चाटत याची चव घेईल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Winter Special: पारंपारिक पद्धतीने घरी बनवा कुरकुरीत अन् चविष्ट कोथिंबीर वडी
कृती