Shravan Recipe: श्रवणात बनवा रताळ्याचे चविष्ट कटलेट, जाणून घ्या रेसिपी
श्रावण महिना अखेर सुरु झाला आहे. हिंदू धर्मात हा महिना पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो. श्रवणातील सोमवारी अनेकजण पूजा-अर्चा करत उपवास करत असतात. श्रावणी सोमवारी उपवास केल्याने भगवान शंकर आपली इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. तुम्हीही या श्रावणात उपवास करत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
आज आम्ही तुमच्यासोबत रताळ्याच्या कटलेटची एक हटके रेसिपी शेअर करत आहोत. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ एकदा जरूर करून पहा. ही रेसिपी चवीला फार अप्रतिम लागते आणि कमी वेळेत बनून तयार होते. रताळ्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी याचे सेवन फायद्याचे ठरते. जाणून घ्या आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत तांदळाचे वडे, नोट करा रेसिपी