Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Kesar Malai Modak Recipe : मिठाईच्या दुकानात मिळणारे केसर मलाई मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे ठरतात. बाप्पाच्या प्रसादासाठी तु्म्ही हे मोदक सोप्या पद्धतीने घरीच तयार करु शकता. चला नोट करुन घेऊयात याची रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2026 | 09:35 AM
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा 'केसर मलाई मोदक', ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा 'केसर मलाई मोदक', ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • गणेशाचे विसर्जन आता जवळ आले आहे.
  • विसर्जनावेळी बाप्पाला खास नैवेद्य देण्याचा विचार करत असाल.
  • तर तुमच्यासाठी केसर मलाई मोदकांचा पर्याय उत्तम ठरेल.
गणेशोत्सव म्हटलं की घराघरात मोदकाचा सुगंध दरवळतो. पारंपरिक उकडीचे मोदक, तळलेले मोदक यांसोबतच सणासुदीला वेगवेगळ्या चवींचे आणि आकर्षक प्रकारचे मोदक तयार करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. त्यापैकीच एक म्हणजे मऊ, मलाईदार आणि सुगंधी केसर मलाई मोदक. दूध आणि मावा यांचा वापर करून तयार केला जाणारा हा मोदक चवीला स्वादिष्ट आणि दिसायला देखणाही असतो. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पाहुण्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी हा मोदक उत्तम पर्याय ठरू शकतो. केशरामुळे मोदकाला सुंदर रंग आणि खास सुगंध मिळतो, तर वरून सजवण्यासाठी बदाम, पिस्ता किंवा काजू वापरल्यास त्याचे रूप आणखी खुलते. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

साहित्य

  • २५० ग्रॅम मावा
  • १०० ग्रॅम साखर
  • ३ ते ४ चमचे दूध
  • ८ ते १० केशराच्या काड्या
  • १ चमचा वेलची पूड
  • १ चमचा तूप
  • २ चमचे बारीक चिरलेले बदाम
  • २ चमचे बारीक चिरलेले पिस्ते
  • सजावटीसाठी थोडे केशर आणि पिस्त्याचे काप
Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम कोमट दुधात केशराच्या काड्या घालून काही मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे केशराचा रंग आणि सुगंध दुधात व्यवस्थित उतरतो.
  • कढई गरम करून त्यात तूप घाला. त्यानंतर मावा घालून मंद आचेवर सतत हलवत भाजा. मावा वितळून मऊ झाल्यावर त्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या.
  • माव्यात केशर घातलेले दूध ओता आणि मिश्रण चांगले एकजीव करा. मंद आचेवर सतत ढवळत राहा.
    आता त्यात साखर घालून व्यवस्थित मिसळा. साखर वितळल्यानंतर मिश्रण थोडं पातळ होईल. ते पुन्हा घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  • मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर वेलची पूड, बदाम आणि पिस्ते घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या.
  • मिश्रण कढईच्या तळाला चिकटू न लागता एकसंध गोळ्यासारखे होऊ लागले की गॅस बंद करा. मिश्रण एका ताटात काढून थोडं कोमट होऊ द्या.
  • मोदकाच्या साच्याला अगदी हलका तुपाचा हात लावा. त्यात तयार मिश्रण भरून व्यवस्थित दाबा आणि साचा
  • उघडून मोदक अलगद बाहेर काढा. वरून पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवा.
  • तयार केसर मलाई मोदक काही मिनिटे थंड झाल्यानंतर सर्व्ह करा.

Web Title: Ganeshotsav 2026 make halwai style kesar malai modak at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
1

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
2

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
3

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
4

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.