डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही हेल्दी टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवनवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण सकाळच्या वेळी उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी थकवा अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक ओट्स टिक्की बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यात कायमच ओट्स खाल्ले जातात. दूध किंवा दह्यात भिजवलेले ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर या पद्धतीने ओट्स पालक टिक्की बनवून खाऊ शकता. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील आणि शरीराला आवश्यक पोषण मिळेल. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते तर ओट्समध्ये प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वांचा खजिना असतो. त्यामुळे नाश्त्यासह इतर वेळी सुद्धा ओट्सपासून बनवलेली प्रोटीन टिक्की तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Why Does Eating Sweets Make To Sleep : गोड खल्याने लगेचं झोप का येते ? काय काहे कारण , जाणुन घ्या …






