Moong Dal Kheer Recipe : बाप्पाला फक्त शिराच नाही तर यंदा प्रसादात अर्पण करा क्रिमी आणि गोड चवीची मूगडाळीची खीर. याची चव सणाचा गोडवा वाढवेल आणि घरातील सर्वांनाच खुश करेल.
(फोटो सौजन्य: Instagram)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मूगाच्या डाळापासून तयार करा खीर.
ही गोड आणि क्रिमी खीर घरातील सर्वांना खुश करेल.
याची रेसिपी फारच सोपी आहे.
गणपतीच्या प्रसादासाठी अनेकदा आपण रव्याचा शिरा तयार करतो. आगमणाच्या वेळीही शिऱ्याचा प्रसाद दाखवला जातो. अशात विसर्जनावेळी तुम्ही काही वेगळं म्हणून रव्याच्या शिऱ्याऐवजी यंदा मूगडाळीचा खीर तयार करु शकता. मूगाची डाळ पोटासाठी चांगली मानली जाते. आपण अनेकदा हिची भाजी खाल्ली असेल पण तुम्हाला माहितीये का? यापासून तुम्ही टेस्टी असे डेझर्ट देखील तयार करु शकता. गणेशाला अर्पण करण्यासाठी गोड आणि क्रिमी मूगाच्या डाळीची खीर एक चांगला पर्याय ठरेल. याची चव फक्त बाप्पालाच नाही तर घरातल्या इतर सदस्यांनाही खुश करुन जाईल. चला मूगाच्या डाळीपासून चविष्ट अशी खीर कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपीजाणून घेऊया. रेसिपीची खासियत म्हणजे ही खीर तयार करण्यासाठी घरातील निवडक साहित्यांची गरज भासते आणि फार कमी वेळेत खीर बनून तयार होते.