Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घामोळ्यांचे औषध तुमच्या स्वयंपाकघरात! ‘हा’ घ्या रामबाण उपाय

उन्हाळ्यात घामोळ्यांपासून बचावासाठी मुलांना हलके कपडे घालावेत, भरपूर पाणी द्यावे आणि चंदन, अ‍ॅलोवेरा, मुलतानी माती यांसारखे घरगुती उपाय वापरावेत. थंड पाण्याने आंघोळ व नीम पानांचा वापर केल्याने त्वचेला आराम मिळतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 30, 2025 | 08:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा सुरू होताच तापमान वाढते आणि त्यासोबत घाम, चिडचिड आणि घामोळ्यांचाही त्रास वाढतो. लहान मुलांची त्वचा अधिक संवेदनशील असल्याने त्यांना घामोळ्यांमुळे जळजळ, खाज आणि अस्वस्थता जाणवते. त्वचेत घाम साचून छिद्रे बंद होतात, ज्यामुळे लालसर पुरळ उठतात आणि खाज सुटते. बाजारात मिळणाऱ्या पावडर आणि क्रीम्स तात्पुरता आराम देतात, पण त्यातील केमिकल्स मुलांच्या कोमल त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे नैसर्गिक आणि घरगुती उपाय जास्त सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.

टॅनिंग आणि सनबर्न टाळण्यासाठी हे घरगुती उपाय वापरून पहा…

घामोळे होण्याची काही मुख्य कारणे म्हणजे जास्त उष्णता, दमट हवामान, त्वचेत घाम साचणे आणि घट्ट, सिंथेटिक कपड्यांमुळे त्वचेला श्वास घेता न येणे. या त्रासावर घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतात. चंदन पावडर आणि गुलाब जल यांचा लेप लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि घामोळ्यांमध्ये आराम मिळतो. अॅलोवेरा जेलमध्ये नैसर्गिक थंडावा आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे ते घामोळ्यांवर लावल्याने लगेच फरक जाणवतो. मुलतानी माती देखील त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असून ती त्वचेतील घाण शोषून घेते आणि थंडावा देते.

थंड पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला त्वरित थंडावा मिळतो आणि घामोळे लवकर बरे होतात. विशेषतः, पाण्यात नीम पाने टाकून आंघोळ घातल्यास त्वचेवरील जळजळ आणि खाज कमी होते. याशिवाय, काकडीचा रस आणि दही यांचा लेप लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि घामोळ्यांवर चांगला परिणाम होतो.

टॅनिंग आणि सनबर्न टाळण्यासाठी हे घरगुती उपाय वापरून पहा…

मुलांना घामोळ्यांपासून वाचवण्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना हलके आणि सूती कपडे घालायला द्यावेत, जेणेकरून त्यांच्या त्वचेला योग्य हवा मिळेल. त्यांना दिवसातून २-३ वेळा नहलवावे आणि घाम आल्यास लगेच मऊ टॉवेलने पुसावे. मुलांनी भरपूर पाणी आणि फळांचा रस प्यावा, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील आणि उष्णतेचा परिणाम कमी होईल. मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळून फळांचे सेवन वाढवावे. या साध्या घरगुती उपायांनी उन्हाळ्यात मुलांची त्वचा निरोगी आणि आनंदी राहू शकते.

Web Title: Get rid of sweat glands with these home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 08:50 PM

Topics:  

  • summer care tips

संबंधित बातम्या

वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल होईल कमी
1

वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल होईल कमी

तळपायांना पडलेल्या भेगांमुळे पाय कोरडे झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा होममेड पेडिक्युअर, पाय होतील स्वच्छ
2

तळपायांना पडलेल्या भेगांमुळे पाय कोरडे झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा होममेड पेडिक्युअर, पाय होतील स्वच्छ

उन्हाळ्यातील धोकादायक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ चविष्ट कांजीचे सेवन, शरीर राहील हायड्रेट
3

उन्हाळ्यातील धोकादायक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ चविष्ट कांजीचे सेवन, शरीर राहील हायड्रेट

कडक उन्हामुळे वारंवार आजारी पडताय? शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन
4

कडक उन्हामुळे वारंवार आजारी पडताय? शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.