
किळसवाण्या पिवळ्या दातांपासून मिळेल सुटका! घरच्याघरी औषधी पदार्थांचा वापर करून बनवा दंतमंजन, तोंडाची दुर्गंधी होईल गायब
हल्ली दातांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायमच दात दुखत असतात. यासोबतच दातांमधून रक्त येणे, हिरड्यांना सूज, दातांना कीड लागणे, दातांवर पिवळा पांढरा थर तयार होणारे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही, पण कालांतराने समस्या वाढू लागतात आणि दात पूर्णपणे खराब होतात. दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी मेडिकलमधील पेनकिलर गोळी आणून खाल्ली जाते. पण सतत सतत पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यास किडनीवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
What is E-Cigarette? ई-सिगारेट म्हणजे काय? जाणून घ्या वेपिंगबाबतचे समज आणि गैरसमज?
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम जसा शरीरावर होतो, तसाच परिणाम दातांवर सुद्धा होता. कारण अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याचदा दातांमध्ये अन्नाचे बारीक कण तसेच साचून राहतात. दातांमध्ये अन्नाचे कण साचून राहिल्यानंतर ते वेळीच स्वच्छ न केल्यास कुसण्यास सुरुवात होते. यामुळे दातांना कीड लागते किंवा हिरड्यांना सूज येण्याची शक्यता असते. दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. पण कालांतराने पुन्हा एकदा दातांच्या समस्या वाढतात. आज आम्ही तुम्हाला दातांमध्ये वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी घरीच आयुर्वेदिक दंतमंजन बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तयार केलेली आयुर्वेदिक दंतमंजन सकाळी उठल्यानंतर दात स्वच्छ करताना वापरावी. ब्रशवर दंतमंजन घेऊन हलक्या हाताने दात घासावे किंवा बोटांच्या सहाय्याने सुद्धा दात स्वच्छ करू शकता. दंतमंजन बनवताना लवंगचा वापर केल्यास दातांच्या वाढलेल्या समस्या कमी होण्यास मदत होईल. लवंगामध्ये ‘युजेनॉल’ नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे दातांमधील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे दातांना लागलेली कीड नष्ट होऊन दात स्वच्छ होतात. हळदीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे हिरड्यांना येणारी सूज कमी होऊन हिरड्यांमधील रक्तस्त्राव थांबतो.
Ans: चहा-कॉफीचे जास्त सेवन, धूम्रपान, तोंडाची योग्य स्वच्छता न राखणे, वाढते वय आणि काही औषधांच्या प्रभावामुळे दात पिवळे पडू शकतात.
Ans: लवंग पावडर, दालचिनी, बेकिंग सोडा, मीठ, हळद, नीम पावडर आणि नारळ तेल यांसारखे नैसर्गिक पदार्थ वापरून घरच्या घरी दंतमंजन तयार केले जाऊ शकते.
Ans: होय. लवंग, पुदिना आणि नीम यांसारख्या औषधी पदार्थांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे दुर्गंधी निर्माण करणारे जंतू कमी करण्यास मदत करू शकतात.