केसांच्या वाढीसाठी मुलतानी मातीचे फायदे
केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. केमिकल ट्रीटमेंट, सतत वेगवेगळे शॅम्पू बदलणे, सीरम वापरणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. पण या सगळ्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळ केस सुंदर आणि चमकदार दिसतात, पण काही दिवसांनंतर पुन्हा एकदा केस गळण्यास सुरुवात होते. त्यामुळे केमिकल उत्पादने वापरताना ते केसांना सूट होतील की नाही पाहावे. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी जसा मुलतानी मातीचा वापर केला जातो, तसाच वापर केसांसाठी सुद्धा केला जातो. मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात.
सतत केस गळणे, कोंडा होणे इत्यादी केसांसंबधित समस्या जाणवू लागल्यानंतर अनेक लोक धुवणे टाळतात. पण असे केल्यामुळे आणखीन केस गळण्याची शक्यता असते. केस धुवण्यासाठी साबणाचा वापर न करतात सल्फेस्ट फ्री शॅम्पूचा वापर करावा. या शॅम्पूमध्ये केमिकल नसल्याने केसांच्या वाढीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. आज आम्ही केस गळतीच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांसाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचे केस गळण्याचे थांबतील.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं बंद करण्याऐवजी पीठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, वजन होईल कमी
सर्वच महिलांना चमकदार सुंदर केस हवे असतात.अशा केसांसाठी योग्य ते हेअर केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे. मुलतानी मातीचा वापर केसांच्या निरोगी आरोग्यसाठी सुद्धा केला जातो. मुलतानी मातीमध्ये असलेले अल्युमिनियम सिलिकेट केसांच्या वाढीसाठी प्रभावी आहे. तसेच यामध्ये चुन्याचे घटक आढळून येतात. चुन्याचे घटक केसांमधील कोंडा, बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल आणि धूळ काढून टाकण्यासाठी मदत करते.
केसांच्या वाढीसाठी मुलतानी मातीचे फायदे
हे देखील वाचा: आयुर्वेदानुसार पाणी कसे प्यावे?
अशा पद्धतीने करा मुलतानी मातीचा वापर:
केस धुवताना मुलतानी मातीचा वापर करा. यासाठी एका वाटीमध्ये शॅम्पू घेऊन त्यात अर्धा चमचा मुलतानी माती मिक्स करा.
त्यानंतर केसांना शॅम्पू लावून केसांची मूळ व्यवस्थित चोळून घ्या.
त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. केसांमध्ये शॅम्पू आणि मातीचे कण राहिल्यास केस चिकट होऊ शकतात.
हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्याने केस गळती थांबण्यास मदत होईल.