Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस गळतीवर टोमॅटोचा रस रामबाण उपाय? टक्कल पडलेल्या ठिकाणीही येतील नवे केस; जाणून घ्या सत्य!

टोमॅटोचा रस केसांसाठी फायदेशीर मानला जातो कारण त्यात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तो टाळू स्वच्छ ठेवण्यास, कोंडा कमी करण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करू शकतो. मात्र, टक्कल पडलेल्या जागी नवीन केस उगवतात...

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 27, 2026 | 05:00 PM
hairfall

hairfall

Follow Us
Close
Follow Us:
  • केस गळतीवर टोमॅटोचा रस रामबाण उपाय?
  • टोमॅटोमध्ये असतात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स
  • काय होतो परिणाम
Tomato Juice to Regrow Hair : पुरुष असो वा महिला, सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचीच केस गळतीची समस्या आहेत. कितीही रासायनिक उत्पादने वापरली किंवा महागडे उपचार घेतले तरी कोणतेही परिणाम दिसून येत नाहीत. यामुळेच लोक घरगुती उपचारांकडे पुन्हा वळताना दिसतात. नवीन केस वाढविण्यासाठी तुम्हीही वेगवेगळे उपाय करुन पाहिले असतील. रासायनिक उत्पादनांवर भरगच्च पैसा खर्च केल्यानंतर तुम्ही सुद्धा कांद्याचा रस, रोझमेरी तेल, आवळा रस आणि लिंबू यासारख्या गोष्टींकडे वळलाय का? पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला टोमॅटो हा रामबाण उपाय ठरु शकतो.  केवळ टॅनिंगसाठीच नाही तर केसांना मजबूत आणि जाड बनवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. तर जाणून घेउयात नेमका टोमॅटो कसा काम करतो.

तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी खरंच शुद्ध आहे का? ‘पारदर्शक’ दिसणारं पाणी असू शकतं आरोग्यासाठी घातक; तज्ज्ञांचा इशारा!

टोमॅटो कसा काम करतो?

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा असा हा टोमॅटो. पण तो जितका सहज उपलब्ध होतो. तितकासा सहज तो नाही आहे. त्याच्यामध्ये  खूप सारखे शक्तीशाली घटक आहेत. लायकोपीनपासून व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. जे कोलेजन उत्पादन आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्याचा फायदा केसांच्या मुळापासून वाढीला होतो. चला ते कसे लावायचे ते जाणून घेऊया.

टोमॅटोचा रस कसा लावायचा?

टोमॅटो किती गुणकारक आहे हे आपण पाहिलं. पण याचा वापर कसा करायचा? तर टोमॅटोचा रस केसांना लावण्यासाठी, एक पिकलेला टोमॅटो घ्या. त्या टोमॅटोचा रस पूर्णपणे काढून घ्या. आता तुमच्या बोटांमध्ये रस घ्या आणि तुमच्या टाळूला हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर, रस कमीत कमी १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर तुमचे केस शॅम्पूने धुवा. अशा पद्धतीने टोमॅटोचा रस डोक्याला लावल्यानंतर केसांमध्ये नक्की फरक दिसून येतो. 

किती वेळा लावावा? 

टोमॅटोचा वापर जितका चांगला तितका बाईट ही ठरु शकतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा हा घरगुती उपाय करु शकता. लक्षात ठेवा की तो जास्त वेळा वापरल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जास्त वापर टाळा. 

हा उपाय कोणी करु नये?

  • ज्यांना खाज सुटण्याचा त्रास आहे
  • ज्यांच्या डोक्याच्या त्वचेवर जळजळ होते
  • ज्यांचे केस जास्त गळत आहेत

केस गळण्याची कारणे

धकाधकीच्या जीवनात आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं आहेत. त्यात आरोग्याच्या समस्यांचा आकडाही जास्त आहे. केस गळती ही आता सहज झालेली समस्या आहे. पण केस गळती होतेय कशामुळे?  शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता यामुळेही केस गळतीची समस्या वाढत चालली आहे.  त्याचबरोबर कामाचा वाढता ताण आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे ताण यामुळे केसांची समस्या वाढतच आहे. वेळेवेळी स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारे हार्मोनल बदल आणि त्यांचं असंतुलन या गोष्टींमुळेही फरक पडतो. त्याचबरोबर मेडीकल कंडीशनही फार बदल घडवतात. एखाद्याला आरोग्याबाबत समस्या असतील तर त्याचा थेट परिणाम शरिरावर दिसून येतो. थायरॉईड सारख्या आरोग्याच्या समस्येमुळेही केसांवर परिणाम होउ शकतात.  त्याचबरोबर केसांची निगा न राखणं हे देखील मुख्य कारण आहे. डोक्यात होणारा कोंडा, बाहेरचं प्रदुषण, योग्य काळजी न घेणं यांसारख्या समस्यांचा परिणाम दिसून येउ शकतो.  काही वेळेला कारणं अनुवांशिक असू शकतात. कुटुंबामध्येच केसांबाबत समस्या असतील तिच समस्या आपल्यात दिसून येउ शकते. 

सात फेरे नाहीत की मंत्र नाही! सेलिब्रिटी कपल रश्मिका-विजयच्या लग्नातील ‘या’ जुन्या पारंपरिक विधी चर्चेत

Web Title: Does tomato juice help regrow hair how to use tomato juice to regrow hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • essential vitamins for body
  • hair care
  • hair care tips in marathi
  • hair fall reason
  • Healthy Hair
  • Long Hair
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

मेडिकलमध्ये MBA करा आणि मिळवा ऑफिसरचा रुतबा अन् लाखांचे पॅकेज! जाणून घ्या हाय-पेईंग कोर्सबद्दल…
1

मेडिकलमध्ये MBA करा आणि मिळवा ऑफिसरचा रुतबा अन् लाखांचे पॅकेज! जाणून घ्या हाय-पेईंग कोर्सबद्दल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.