साधी चव पण अनोखं रूप… कुरकुरीत शीटमध्ये दडलीये स्टाफिंग, पॉकेट समोसा कधी खाल्लाय का? पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी
Pocket Samosa Recipe : सामोसा हा भारतीयांचा आवडता स्नॅक्स, पण याला ट्विस्ट देऊन तुम्ही यापासून अनोखा आणि आकर्षित असा सामोसा तयार करू शकता ज्याला पॉकेट सामोसा असं म्हटलं जात.
पॉकेट समोसा ही एक अतिशय चविष्ट आणि आकर्षक दिसणारी डिश आहे. पारंपरिक समोश्यांपेक्षा हा प्रकार थोडा वेगळा असला, तरी त्यातील खमंगपणा आणि मसाल्यांचा सुवास तितकाच रमणीय असतो. घरात कुणाला पटकन काहीतरी विशेष खायला द्यायचे असेल, मुलांच्या डब्यात काहीतरी नवीन ठेवायचे असेल किंवा संध्याकाळच्या चहासोबत गरमागरम स्नॅक हवा असेल, तर पॉकेट समोसा हा उत्तम पर्याय ठरतो. हा साधा, कमी साहित्यांत आणि सहज बनणारा पदार्थ असल्यामुळे नवशिक्यांनाही तो सहज जमतो. कुरकुरीत बाहेरची पापडी, आतून मसालेदार सारण आणि सुंदर चौरस आकार यामुळे हा पदार्थ टेबलावर लगेच उठून दिसतो. आजकाल बाजारात विविध प्रकारचे समोसे मिळतात, पण घरच्या घरी केलेला पॉकेट समोसा हा अधिक स्वच्छ, चविष्ट आणि आपल्या आवडीनुसार बदलता येणारा असतो. म्हणूनच हा पदार्थ अनेक घरांमध्ये आवडीने बनवला जातो.
यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, मीठ आणि थोडेसे तूप किंवा तेल घालून छान मिसळावे. पाणी घालून घट्ट पण मऊसर पीठ मळून घ्यावे आणि त्यावर ओलसर कापड ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवावे.
सारणासाठी कढईत थोडे तेल गरम करावे. त्यात कांदा घालून हलके सोनेरी होईपर्यंत परतावे. त्यात आले लसूण पेस्ट घालून छान परतावे. नंतर हळद, तिखट,
गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे. उकडलेले बटाटे मॅश करून त्यात घालावे, वाटाणा दाणेही घालावेत आणि सर्व मिश्रण छान परतावे. शेवटी कोथिंबीर घालून सारण तयार ठेवावे.
मळलेले पीठ घेऊन छोट्या पोळ्या लाटाव्यात. त्या पोळीला मधेच दुमडून चौरस आकार देण्यासाठी दोन्ही बाजूंनी किनारी जाडसर ठेवावी. तयार झालेल्या भागात बटाट्याचे सारण भरून किनारीला हलकेच दाबून पॉकेटसारखा आकार तयार करावा.
कढईत तेल गरम करून हे पॉकेट समोसे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. तळल्यानंतर जास्तीचे तेल निघून जावे म्हणून कागदी टॉवेलवर ठेवावेत.
गरमागरम पॉकेट समोसे चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहा सोबत सर्व्ह करावेत.
Web Title: Have you ever try pocket samosa make it at home note down the recipe in marathi