Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

Vada Pav Recipe : मुंबईकरांच्या आवडीचा आणि सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. मऊ पावात भरलेला कुरकरीत वडा, चटणी आणि त्यासोबत तळेलेली हिरवी मिरची यांची चव मनाला तृप्त करणारी ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 03:30 PM
बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत 'वडा पाव' बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत 'वडा पाव' बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • वडापाव हा मुंबईचा एक फेमच स्ट्रीट फूड आहे.
  • हा झणझणीत आणि कुरकुरीत चवीचा वडापाव आपण घरीदेखील तयार करु शकतो.
  • स्ट्रीट स्टाईल चवीचा हा चविष्ट वडापाव तुम्ही घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करु शकता.
मुंबईची ओळख म्हटली की डोळ्यासमोर येतो तो गरमागरम वडा पाव. कामाच्या घाईत असो, कॉलेजची सुट्टी असो किंवा पावसाळ्यातील संध्याकाळ वडा पाव हा प्रत्येकाचा आवडता साथीदार. साधा दिसणारा पण चवीने अप्रतिम असा हा पदार्थ मुंबईच्या रस्त्यांवर जन्माला आला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभर लोकप्रिय झाला आहे.

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

बाहेरून कुरकुरीत बेसनाच्या आवरणातला मसालेदार बटाट्याचा वडा, त्यात लसूण-कोरडी चटणी, हिरवी तिखट चटणी आणि मऊ पाव या सगळ्यांचा संगम म्हणजे अस्सल वडा पाव. योग्य प्रमाणातील मसाले, फोडणीचा सुगंध आणि ताजेपणा हेच या पदार्थाचं खरे गमक आहे. चला तर मग, घरच्या घरी खमंग आणि अस्सल चवीचा वडा पाव कसा करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

बटाट्याच्या वड्यासाठी

  • उकडलेले बटाटे – ४ ते ५ मध्यम आकाराचे
  • हिरव्या मिरच्या – २ ते ३ (बारीक चिरलेल्या)
  • लसूण – ५ ते ६ पाकळ्या (ठेचलेल्या)
  • आले – १ छोटा तुकडा (ठेचलेला)
  • मोहरी – १ टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • हळद – ½ टीस्पून
  • कढीपत्ता – ८ ते १० पाने
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • तेल – फोडणीसाठी
बेसनाचं पीठ
  • बेसन – १ कप
  • हळद – चिमूटभर
  • मीठ – चवीनुसार
  • बेकिंग सोडा – चिमूटभर
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
इतर साहित्य
  • वडा पावसाठी पाव – आवश्यकतेनुसार
  • पुदीना चटणी
  • लसूण चटणी
  • तळण्यासाठी तेल
उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी

कृती

  • कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी टाका. ती तडतडली की हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरचीची पेस्ट, आले-लसूण घालून परता.
  • त्यानंतर हळद घालून लगेच उकडलेले बटाटे हाताने कुस्करून त्यात मिसळा. मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. हे मिश्रण थंड होऊ द्या आणि मग याचे गोल वडे तयार करा.
  • एका भांड्यात बेसन घ्या. त्यात हळद, मीठ आणि चिमूटभर सोडा घालून पाणी टाकत घट्टसर पण ओघळेल असं पीठ तयार करा.
  • कढईत तेल गरम करा. बटाट्याचे गोळे बेसनाच्या पिठात बुडवून मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • लसूण कोरडी चटणी बनवण्यासाठी लसूण, शेंगदाणे, मीठ आणि लप तिखट मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
  • पाव मधून कापून त्यावर लसूण चटणी, पुदीना चटणी लावा. गरम वडा आत ठेवून हलकेच दाबा.
  • गरमागरम वडा पाव तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make mumbai famous street food vada pav at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • street food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
2

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
3

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
4

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.