Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’

Pahadi Noon Recipe : पहाडी नून हे उत्तराखंडमधील एक पारंपारिक हिरवं मीठ आहे जे औषधी वनस्पतींनी युक्त असते. हे मीठ चवीला तर चटपटीत असतंच शिवाय ते पचनाच्या समस्याही दूर करतं. नोट करूयात याची सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 03:26 PM
Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत... साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा 'पहाडी हिरवं मीठ'

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत... साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा 'पहाडी हिरवं मीठ'

Follow Us
Follow Us:
  • पहाडी नून हे हे उत्तराखंडमधील पारंपारिक, नैसर्गिक आणि औषधी वनस्पतींनी युक्त मीठ आहे.
  • अनेक पदार्थांचा यात वापर केला जात असल्याने याची चव द्विगुणित होते.
  • हे मीठ पचनासाठी खूप फायद्याचे मानले जाते.
पारंपरिक पद्धतीने डोंगराळ भागात तयार केलं जाणारं नून किंवा पिस्युं लून हे अनेक पिढ्यांपासून महिलांनी जपलेलं खास खाद्यवारसा आहे. पूर्वी हे फक्त घरगुती वापरासाठी बनवलं जायचं, पण आता स्थानिक बाजारातही याची विक्री केली जाते. पर्यटकही डोंगरातून परतताना हे खास चविष्ट नून आवर्जून खरेदी करतात. आज या पारंपरिक नूनला देशभरच नव्हे तर परदेशातही मागणी वाढली आहे.

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

प्रत्येक घराची नून बनवण्याची पद्धत वेगळी असते. मसाले आणि ताज्या हिरव्या पालेभाज्यांमुळे या नूनला एक वेगळी, झणझणीत आणि ताजेतवाने चव मिळते. भाजी, फ्रुट चाट, रायता, सॅलड किंवा साध्या जेवणावर भुरभुरवलं तरी यामुळे पदार्थांची चव अधिक खुलते. एकदा हे नून घरी बनवलं की पुन्हा पुन्हा बनवण्याची मागणी होणारच. चला तर मग, घरच्या घरी हे पारंपरिक पहाडी नून कसं बनवायचं याची रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य

  • १/२ कप हिरवा लसूण
  • १/४ कप कोथिंबीर
  • २ मोठे चमचे जिरे
  • ३ चमचे साबूत धणे
  • एक मूठ पुदिना
  • ६ ते ७ लसूण पाकळ्या
  • १ ते १½ इंच आल्याचा तुकडा
  • ५–६ हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
  • १/२ कप मीठ
कृती
  • सर्वप्रथम हिरवा लसूण आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. नंतर बारीक चिरून घ्या.
  • लसूण पाकळ्या सोलून घ्या. आलं सोलून तुकडे करा आणि हिरव्या मिरच्यांचे देठ काढून ठेवा.
  • जिरे आणि धणे हलक्या आचेवर कोरडे भाजून घ्या, जेणेकरून त्यांचा सुगंध छान येईल.
  • आता चिरलेला हिरवा लसूण, कोथिंबीर, पुदिना, लसूण पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या आणि भाजलेले मसाले एकत्र करा.
  • या सर्व मिश्रणात मीठ घालून ते जाडसर वाटून घ्या. पेस्ट फार बारीक करू नका; थोडासा खडबडीत पोत राहू द्या.
  • पारंपरिक पद्धतीनुसार हे नून सिलबट्ट्यावर वाटलं जातं, ज्यामुळे त्याची चव आणि टेक्स्चर अधिक उठून दिसते.
  • मात्र, सिलबट्टा नसेल तर मिक्सरचाही वापर करू शकता.
    तयार झालेले हिरवे नून एअरटाइट डब्यात भरून ठेवा. योग्य प्रकारे साठवले तर हे किमान एक महिना टिकते.
वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी काय करायचं?

  • जर नून अधिक काळ टिकवायचं असेल, तर ते एका ताटात पसरवून उन्हात पूर्ण वाळू द्या. पूर्ण कोरडे झाल्यावर खलबत्त्यात भरड वाटून पुन्हा मीठासारखा पोत तयार करा.
  • लवकर वाळवायचं असल्यास एअर फ्रायरमध्ये किंवा सुमारे ८० अंश सेल्सियस तापमानावर ओव्हनमध्ये काही वेळ ठेऊ शकता.
  • अशा प्रकारे तयार केलेले पारंपरिक पहाडी नून तुमच्या रोजच्या जेवणात एक खास डोंगराळ चव आणि सुगंध आणेल.

Web Title: How to make pahadi noon at home flavoured salt recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
1

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
2

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव
3

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.