Health Update: मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान होते, उपचारांचे काय? एनसीडी तपासणीत लाखो रुग्ण आढळले

जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ९ हजार रुग्णांना आहारविषयक समुपदेशन देण्यात आले. महापालिकेच्या सिव्हिक डायरीमध्ये उच्च रक्तदाबाचे १ लाख १६ हजार ८७२ आणि मधुमेहाचे ६८ हजार ८८६ रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद आहे.(फोटो सौजन्य – istock)
Health Update: मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान होते, उपचारांचे काय?
Health Update: मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान होते, उपचारांचे काय?
Published on: 
Updated on: 

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे निदान करण्यासाठी सरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणात तपासणी मोहिमा राबविल्या जात आहेत. मात्र, तपासणीत आजार आढळल्यानंतर रुग्ण नियमित औषधोपचार घेतात का, त्यांचा फॉलोअप सुरू राहतो का आणि किती रुग्ण उपचारांमध्ये खंड पडल्याने आजार अनियंत्रित होतात, याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे निदानाच्या आकडेवारीबरोबरच उपचार आणि फॉलोअपची प्रभावी यंत्रणा उभारण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

Health Update: मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान होते, उपचारांचे काय?
पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

मुंबई महापालिकेच्या जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील माहितीनुसार, १ लाख ८० हजार १०३ नागरिकांची एनसीडी तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेहासाठी ६५ हजार ८५, तर उच्च रक्तदाबासाठी ७२ हजार १८ नागरिकांची तपासणी झाली. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ९ हजार रुग्णांना आहारविषयक समुपदेशन देण्यात आले. महापालिकेच्या सिव्हिक डायरीमध्ये उच्च रक्तदाबाचे १ लाख १६ हजार ८७२ आणि मधुमेहाचे ६८ हजार ८८६ रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद आहे.

किती जण नियमित उपचार घेतात?

निदान झालेल्या रुग्णांपैकी किती जण नियमित उपचार घेतात, किती जणांचा फॉलोअप सुटतो आणि औषधोपचारात खंड पडणाऱ्यांचे प्रमाण किती, याची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध झाल्यास एनसीडी नियंत्रण मोहिमेच्या परिणामकारकतेचे वास्तव समोर येऊ शकते.आणि किडनीवर परिणाम होऊ शकते नह नियंत्रणात न राहिल्यास विविध संसर्ग, किडनीचे आजार आणि डोळ्यांची दृष्टी जाण्यापर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात, रुग्णांचा फॉलोअप सुटला, औषधोपचार नियमित झाले नाहीत, तर आजाराची गुंतागुंत वाढत जाते. अनेक रुग्ण स्ट्रोक किवा हार्ट अटॅक झाल्यानंतरच आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे वेळेत निदान करून आजार नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

Health Update: मधुमेह, उच्च रक्तदाबाचे निदान होते, उपचारांचे काय?
Arthritis: संधिवाताचा त्रास होतोय? वेदना आणि सूज कमी करण्यासाठी जाणून घ्या हे महत्त्वाचे उपाय!

केंद्राची आकडेवारी:

  • राज्याच्या विशेष मोहिमेत २५ लाख ८२ हजार ९९२ जणांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० लाख ७०४ जणांना उच्च रक्तदाब आढळला.

  • मधुमेहाच्या १२ लाख ५२ हजार ४३४ तपासण्यांमध्ये २ लाख ८८ हजार ८२ रुग्ण निदान झाले.

  • शिवाय देशभरात फेब्रुवारी २०२६ पर्यंत उच्च रक्तदाबाचे ७ कोटी ८५ लाख ९१४ रुग्ण, तर मधुमेहाचे ४ कोटी ६८ लाख ४८ हजार ९८२ रुग्ण निदान झाल्याची केंद्राची आकडेवारी आहे.त्यापैकी अनुक्रमे ७९.५ आणि ७२.४ टक्के रुग्णांवर उपचार सुरू असल्याची नोंद आहे.