Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ हेल्दी ड्रिंक्स करतील ॲसिडिटीचा नायनाट, आजच जाणून घ्या याबद्दल

आपल्या सर्वांचा चटकदार पदार्थ खाण्याची सवय असते. पण कधीकधी खूप मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपली पचनसंस्था बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. ॲसिडिटीवर मात करण्यासाठी तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्सची मदत घेऊ शकता.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 10, 2024 | 03:16 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि खानपानाच्या सवयींमुळे आपला दैनंदिन आहार सुद्धा बदलला आहे. आज घरातल्या चपाती भाजीची जागा पिझ्झा आणि बर्गर घेत आहे. मग अशावेळी आपल्याला अनेक आरोग्यासंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक मोठी आणि कॉमन समस्या म्हणजे ॲसिडिटी.

पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार झाल्यामुळे ॲसिडिटी होते. ही समस्या बऱ्याच लोकांसाठी अस्वस्थ आणि वेदनादायक असू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ, पोटदुखी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

ॲसिडिटीची समस्या हल्ली प्रत्येकाला जाणवत असते. काही जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात तर काही जण अनेक यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी काही पेयांचे सेवन खूप प्रभावी ठरू शकते. चला जाणून घेऊया, अशी कोणती नैसर्गिक पेये आहेत जी ॲसिडिटीपासून आपल्याला आराम देतात.

हे देखील वाचा: आज घरी बनवा ‘ही’ हटके रेसिपी; जाणून घ्या, चायनीज नूडल्स समोसे बनवण्याची सोपी पद्धत

नारळ पाणी

नारळ पाणी हे सर्वोत्तम नैसर्गिक पेयांपैकी एक आहे, ज्याचा उपयोग तुम्ही ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी करू शकता. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम आपली पचनसंस्था सुधारते आणि पोटातील आम्ल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. नारळाचे पाणी पोटातील ॲसिडला न्यूट्रलाइज करते, ज्यामुळे ॲसिडिटीच्या लक्षणांपासून आपल्याला आराम मिळू शकतो.

एलोवेरा ज्यूस

कोरफड म्हणजेच एलोवेराचा रस पोटासाठी नैसर्गिक उपचार म्हणून काम करतो. हे आपल्या पचनसंस्थेला शांत करते. एलोवेराच्या ज्युसचे सेवन केल्याने ॲसिडिटीमुळे होणारी चिडचिड आणि सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.

हे देखील वाचा: सतत थकल्यासारखे, अशक्त आणि उदास वाटते? जाणून घ्या तुमच्या शरीरात कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता आहे

थंड दूध

जर तुम्हाला ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळवायचा असेल तर थंड दूध हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे पोटातील ऍसिडचे उत्पादन नियंत्रित करते. थंड दुधाचे सेवन केल्याने पोटातील जळजळ शांत होते आणि ॲसिडिटीमुळे होणारा त्रास कमी होतो.

आलं टाकून बनवलेला चहा

आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरातील पचन सुधारतात आणि ॲसिडिटीची लक्षणे कमी करतात. आल्याच्या चहाच्या सेवनाने पोटातील ॲसिडचे प्रमाण कमी होते आणि पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. हे करण्यासाठी, आल्याचे काही तुकडे पाण्यात उकळा आणि थोडे थंड झाल्यावर सेवन करा.

जिरे पाणी

जिऱ्यामध्ये पचन सुधारण्याचे चांगले गुणधर्म असतात, जे पोटातील ॲसिडिटी नियंत्रित करते. जिऱ्याच्या पाण्यामुळे ॲसिडिटीपासून आराम मिळतो आणि पोटातील गॅसची समस्याही कमी होते. ॲसिडिटीच्या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे उकळा आणि ते थंड झाल्यावर प्या.

Web Title: Healthy drinks that will lower acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 03:15 PM

Topics:  

  • Healhy Lifestyle

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.