Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

शरीराच्या तापमानात वाढ झाल्यानंतर कोणत्याही शनि हिट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया हिट स्ट्रोक म्हणजे काय आणि त्याची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 01:04 PM
वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

Follow Us
Follow Us:

हिट स्ट्रोक म्हणजे काय?
हिट स्ट्रोक येण्याची कारणे?
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे?

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कुठेही बाहेर जाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. कारण कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर डोकेदुखी, उलट्या, मळमळ होण्याची जास्त शक्यता असते. तर काहीवेळा डिहायड्रेशन होऊन वारंवार चक्कर येते. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडून जाते. यामुळे शरीरात कोरडेपणा जाणवू लागतो. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. शरीराच्या तापमानात वाढ झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोक येऊन मृत्यू होऊ शकतो. हिट स्ट्रोक येणे ही अतिशय गंभीर स्थिती आहे. यामध्ये शरीराचे तापमान अचानक वाढते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो. चला तर जाणून हिट स्ट्रोकची लक्षणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?

हीट स्ट्रोकमुळे मृत्यू कसा होतो?

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काहीवेळा शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि शरीर थंड करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. हिट स्ट्रोक आल्यानंतर सगळ्यात आधी मेंदू, हृदय आणि किडनी यांसारख्या अतिमहत्वाच्या अवयवांवर लगेच परिणाम होतो. तसेच शरीरात वाढलेल्या तापमानामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते. गोंधळ, झटके येणे, कोमा किंवा मानसिक नियंत्रण हरवणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला जास्तीचे काम करावे लागते, ज्यामुळे हृदयाच्या पेशी कमकुवत होऊन जातात.

हिट स्ट्रोकची लक्षणे:

  • शरीर खूप जास्त गरम होणे
  • मानसिक बदल, गोंधळ किंवा अस्वस्थता
  • बोलण्यात अस्पष्टता जाणवणे.
  • झटके येणे किंवा कोमा
  • त्वचा कधी गरम व कोरडी तर कधी जास्त घाम येणे
  • पोटदुखी किंवा मळमळ
  • त्वचा लाल होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे
  • डोकेदुखी आणि दम लागणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

हिट स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी उपाय:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सुती आणि आरामदायी कपडे परिधान करावेत. सुती कपडे घातल्यामुळे हवा खेळती राहते आणि गरम होत नाही. उन्हात कुठेही बाहेर फिरायला जाताना सोबत पाण्याची बाटली, टोपी, सनग्लासेस वापरावे. याशिवाय त्वचेच्या रक्षणासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. दिवसभरातील अतिउष्णतेच्या वेळी शारीरिक कष्टाची कामे करू नयेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उष्माघात म्हणजे काय?

    Ans: उष्माघात ही शरीरातील उष्णता नियंत्रणाबाहेर गेल्याने निर्माण होणारी गंभीर स्थिती आहे.

  • Que: उष्माघाताची लक्षणे कोणती?

    Ans: तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे.

  • Que: उष्माघाताची मुख्य कारणे कोणती?

    Ans: अति उष्ण आणि दमट हवामानात जास्त वेळ राहणे, कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणे.

Web Title: Heatstroke can kill you at any moment during the growing summer take care to prevent heat stroke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Heath Streak
  • summer care tips
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.