Love Bite चे दुष्परिणाम
रोमँटिक रिलेशनशिपमध्ये जोडपे आपले प्रेम अनेक प्रकारे व्यक्त करतात. कधी कपाळावर चुंबन घेणे, कधी हातावर किस घेणे तर कधी एकमेकांना मिठीत घेणे हे अत्यंत कॉमन आहे आणि असेच एक कॉमन फॅक्टर आहे ते म्हणजे लव्ह बाईट. लव्ह रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवताना Love Bite खूप सामान्य आहे. लोकांना शारीरिक सुखात अत्युच्च सुख गाठण्यासाठीदेखील हे खूप उपयुक्त आहे. अनेकवेळा जोडीदार इतका उत्तेजित होतो की तो उत्साहाच्या भरात शरीराच्या कोणत्याही भागाला लव्ह बाइट देतो. त्यामुळे त्या भागावर दातांचे निशाण उमटतात आणि भाग लाल राहतो तर पुढचे काही दिवस शरीराचा हा भाग काळानिळाही दिसू शकतो.
लव्ह बाईटमध्ये एक पार्टनर दुसऱ्याच्या त्वचेला किस करतो किंवा चावतो. तुमच्यापैकी अनेकांनी तुमच्या जोडीदाराला लव्ह बाइट्स दिले असतील. यात काही गैर नाही. रोमान्स किंवा शारीरिक संबंधांदरम्यान उत्साह वाढवण्यासाठी लव्ह बाइट्स देणे हा एक चांगला पर्याय आहे. पण त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत, ज्याबद्दल प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. लव्ह बाईट कसे हानिकारक आहेत हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर माधव भागवत यांनी दिलेला हा लेख नक्की वाचा (फोटो सौजन्य – iStock)
Love Bite म्हणजे काय?
लव्ह बाइट्सला “हिकी” देखील म्हणतात. रक्त गळती आणि पेशी फुटल्यामुळे त्वचेवर उमटलेल्या खुणांना लव्ह बाइट्स म्हणतात. ही खूण त्वचेच्या मऊ भागावर तोंड लावून बराच वेळ जबरदस्तीने चोखल्याने वा चावल्याने तयार होते. त्यानंतर त्वचेवर गडद लाल रंगाची खूण तयार होते. लव्ह बाईट हे सामान्यतः डीप लव्ह आणि विश्वासाचे लक्षण मानले जाते. चुंबनाप्रमाणेच लव्ह बाईट कोणताही मुलगा किंवा मुलगी देऊ शकतो. तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम दाखवण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे असे मानले जाते
Pregnancy दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून योग्य माहिती
काय आहेत दुष्परिणाम
यामुळे लव्ह बाईट घेताना उत्साहाच्या भरात न वाहता अत्यंत सावधपणाने घ्यावेत आणि आपल्या जोडीदाराला कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी
सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
सावधानता
लव्ह बाईट हे सहसा हानिकारक नसतात. परंतु काहीवेळा योग्यरित्या न दिल्यास गैरसोय आणि पेच निर्माण होतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला कधीच लव्ह बाइट्स दिले नसेल तर आधी योग्य पद्धत जाणून घ्या जेणेकरून भविष्यात दुष्परिणाम टाळता येतील. लव्ह बाईट्स देताना आपल्या जोडीदाराची परवानगी घ्या आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन मगच लव्ह बाईट्स घ्या वा द्या