२७ फेब्रुवारीला का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन?
संपूर्ण महाराष्ट्रभरात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषांचे सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा सगळीकडे प्रसिद्ध आहे. मराठी भाषा समृद्ध करण्याचे आणि जगभरात पसरवण्याचे काम अनेक मराठी साहित्यिकांनी केले आहे. भारतातील प्रमुख भाषांमध्ये मराठी भाषा सगळ्यात उच्च मानली जाते. शिवाय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे हीच मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी आणि मराठीचा आदर व्हावा, यासाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी 27 फेब्रुवारीला शाळा, महाविद्यालयांमध्ये भाषण, निबंध स्पर्धा, लेखन, एकांकिका इत्यादी अनेक गोष्टींचे आयोजन केले जाते.(फोटो सौजन्य – pinterest)
रस्त्याच्या शेजारील झाडांना पांढरा रंग का मारला जातो? जाणून घ्या कारण
मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या वाढदिवसांनिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. शासन निर्णयानुसार, कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 21 जानेवारी इ.स. 2013 रोजी घेतला होता. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आला आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा 27 फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला होता. कवी कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून सर्वदूर मोठी ख्याती आहे. त्यांनी मराठी भाषांचे सन्मान वाढवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
1 फळ खाताच नियंत्रणात येईल त्वरीत High BP, 100 वर्षापर्यंत ब्लड प्रेशरची पातळी राहील आटोक्यात
मराठी भाषेला भारतासह इतर सर्व देशांमध्ये सन्मान केला जातो. हा दिवस मराठी साहित्याचे सन्मान करणारा दिवस आहे. तसेच समकालीन इंडो-आर्यन भाषांपैकी मराठीमध्ये अनेक साहित्य आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी सगळ्यात पहिली भाषा मराठी आहे. 1999 मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. याआधी मराठी भाषा महारथी, महाराष्ट्री, मराठी किंवा मल्हाटी म्हणून ओळखली जात होती.