
उन्हाळ्यात किंवा पोट खराब झाल्यानंतर तोंडामध्ये उष्णतेचे फोड येतात. हे फोड आल्यानंतर तोंडातील त्वचा लाल होऊन वेदना होण्यास सुरुवात होते. या वेदना एवढ्या तीव्र असतात की यामुळे जेवण सुद्धा नकोसे वाटते. तोंडात आलेले फोड अनेकदा लवकर बरे होत नाहीत. पोट खराब झाल्यानंतर शक्यतो हे फोड येतात. तोंडात फोड आल्यानंतर तिखट किंवा गरम अन्नपदार्थ खाता येत नाहीत. त्यामुळे साधे आणि पातळ पदार्थ खावे लागतात. फोड बरे करण्यासाठी आपण मेडिकल मध्ये मिळणारी औषध घेतो. पण याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला तोंडात आलेले फोड बरे करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे हे फोड लवकर बरे होतील. (फोटो सौजन्य – iStock)
तोंडात आलेले फोड बरे करण्यासाठी घरगुती उपाय:
केळी:
तोंडात आलेले फोड बरे करण्यासाठी रोजच्या आहारात केळ्याचे सेवन करावे. तसेच एक केळ घेऊन ते मधून मधून कापून घ्या. त्यानंतर त्यात वेलची भरून घ्या. कुकरच्या भांड्यात हे केळ उकडून झाल्यानंतर त्यातील वेलची काढून खाल्ल्यास तोंडात फोड तात्काळ बरे होण्यास मदत होईल. हा घरगुती उपाय केल्यास तोंडात आलेले फोड लवकर बरे होतील.
[read_also content=”सकाळी उठल्यानंतर तुम्ही सुद्धा डोळे चोळता का? तर उद्भवू शकतात गंभीर समस्या https://www.navarashtra.com/lifestyle/serious-problems-after-rubbing-the-eyes-544631.html”]
मेथीची पाने:
चवीला कडू असणाऱ्या मेथीचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. जेवणाच्या पदार्थांमध्ये मेथीपासून बनवलेली भाजी, पराठा इत्यादी प[पदार्थ आपण खातो. तोंडातील फोड बरे करण्यासाठी मेथीची पाने प्रभावी आहेत. यासाठी मेथीची पाने गरम पाण्यात उकळा. त्यानंतर हे पाणी प्यायल्यास तोंडातील फोड बरे होतील.
खोबरेल तेल:
तोंडात ज्या ठिकाणी फोड आले असतील त्या ठिकाणी खोबऱ्याचे तेल लावावे. यामुळे दातांच्या हिरड्या देखील साफ होण्यास मदत होईल.
[read_also content=”ब्रेन ट्युमरची लक्षणे दिसू लागल्यास कसे करावे औषध उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-do-medical-treatment-if-brain-tumor-symptoms-appear-544579.html”]
मीठाचे पाणी:
तोंडात फोड आल्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. यामुळे तोंडातील फोड बरे होण्यास मदत होईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.