मुरुमांचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय
वाढत्या वयानुसार चेहऱ्यामध्ये अनेक बदल होत असतात. त्यामध्ये चेहऱ्यावर मुरूम येणं ही एक सामान्य समस्या आहे. चेहऱ्यावर मुरूम आल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. मुरूम, मुरुमांचे डाग, फोड इत्यादी गोष्टींमुळे चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. यामुळे चेहऱ्यावरील चमक निघून जाते. मुरूम किंवा फोड आल्यानंतर त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. डाग घालवण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स किंवा मग चेहरा उजळवणाऱ्या क्रीम लावल्या जातात. या क्रीम लावल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महागड्या क्रीम्स वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करून पहा. हे उपाय केल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होऊन सुंदर आणि चमकदार दिसेल.(फोटो सौजन्य-istock)
मुरुमांचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय
मध हे नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून त्वचेवर काम करते. मध लावल्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. तसेच मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मधाचा वापर करावा. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मुरूम आलेल्या ठिकाणी मध लावून रात्रभर तसेच ठेवून घ्या. त्यानंतर सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग निघून जातील.
मुरुमांचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय
चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग घालवण्यासाठी कोरफड जेल अतिशय प्रभावी आहे. यासाठी एका वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात कडुलिंबाची पावडर मिक्स करून चेहऱ्याला लावा. चेहरा कोरडा झाल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेले मुरूम आणि मुरुमांचे डाग निघून जाण्यास मदत होईल.
मुरुमांचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय
त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी ग्रीन टी अतिशय प्रभावी आहे. यासाठी अर्धा वाटी पाणी घेऊन त्यात ग्रीन टी उकळा. त्यानंतर तयार केलेले पाणी गाळून स्प्रे बाटलीमध्ये भरा आणि चेहऱ्यावर सकाळ आणि संध्याकाळी स्प्रे करा. यामुळे मुरुमांचे डाग निघून जाण्यास मदत होईल.