Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स- ऍक्ने घालवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, त्वचेवर येईल ग्लो

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि ऍक्ने घालवण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 08, 2026 | 10:06 AM
तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स- ऍक्ने घालवण्यासाठी करून पहा 'हे' सोपे घरगुती उपाय

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स- ऍक्ने घालवण्यासाठी करून पहा 'हे' सोपे घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीन तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे फेशिअल करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. कायमच चेहऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेवर मोठे पिंपल्स, ऍक्ने, मुरूम इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला कायमच महागड्या स्किन ट्रीटमेंटकडे वळतात. पण वारंवार केलेल्या केमिकल ट्रीटमेंट त्वचेसाठी फारश्या चांगल्या नाहीत. यामुळे उतार वयात त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. हल्ली तरुण वयातील मुलामुलींच्या त्वचेवर सुरकुत्या, ऍक्ने, ब्रेकआऊट दिसू लागतात. त्वचेचे सौंदर्य कमी झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स आणि ऍक्ने घालवण्यासाठी कोणते उपाय करावेत. याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती उपाय कायमच त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय

चेहऱ्यावरचे ॲक्ने, ब्रेकआऊट्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नाहीतर शरीर आणि त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असतात. त्यातील अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे दालचिनी. दालचिनीचा वापर केल्यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. यामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्वचेसाठी दालचिनी फायदेशीर आहे. सहाणेवर थोडं मध आणि दूध घालून त्यावर दालचिनी उगाळून घ्या. तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटं तसाच ठेवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास चेहऱ्यावर आलेले डाग आणि पिंपल्स कमी होऊन जातील. पण दालचिनी प्रत्येकाला सूट होईल असे नाही. त्यामुळे दालचिनीचा वापर करताना पॅच टेस्ट करून पाहणे आवश्यक आहे.

पित्ताच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर कायमच पिंपल्स आणि बारीक बारीक मुरुमांचे फोड येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स लवकर कमी होत नाही. गुलाब आणि चंदन असलेल्या फेसवॉशने त्वचा स्वच्छ करावी. तसेच गुलाब पाण्याचा वापर टोनर म्हणून करावा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड, टी ट्री ऑईल किंवा मध इत्यादींचा वापर करून बनवलेले हायड्रेटींग मॉईश्चरायझर लावावे.

बोटॉक्स ट्रीटमेंटची कधीच भासणार नाही गरज! आजीबाईच्या बटव्यातील ‘या’ पदार्थाचा वापर करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो

सुंदर दिसण्यासाठी त्वचेची बाहेरून ज्याप्रकारे काळजी घेतली जाते आतून घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. रोजच्या आहारात नियमित मनुके, पालेभाज्या आणि तुपाचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसेच नियमित भरपूर पाणी पिऊन त्वचा हायड्रेट ठेवावी. पाण्यासोबतच विटामिन युक्त फळांच्या रसाचे सेवन करावे. आल्याचा रस आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर आलेले मुरूम आणि पिंपल्स कमी होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Try these simple home remedies to get rid of breakouts and acne that appear on the face during youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर
1

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन
2

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन

कपाळावर वाढलेला काळेपणा काही मिनिटांमध्ये होईल गायब! टॅनिंग घालवण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय, पार्लरचा वाचेल खर्च
3

कपाळावर वाढलेला काळेपणा काही मिनिटांमध्ये होईल गायब! टॅनिंग घालवण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय, पार्लरचा वाचेल खर्च

चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळवंडलेली दिसते? मग ‘या’ पद्धतीने करा बेसन पिठाचा वापर, चेहरा होईल तेजस्वी
4

चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळवंडलेली दिसते? मग ‘या’ पद्धतीने करा बेसन पिठाचा वापर, चेहरा होईल तेजस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.