केसांच्या वाढीसाठी अशा पद्धतीने बनवा हेल्दी ड्रिंक
सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केस स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी बाजारात मिळणारे वेगवेगळे शॅम्पू, कंडिशनर, हेअरमास्क इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. पण सतत केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता कमी होण्यास सुरुवात होते. हळूहळू केसांची वाढ थांबून केस खराब होऊन जातात. केस गळणे ही एक सामान्य समस्या असून महिला आणि पुरुषांमध्ये सुद्धा दिसून आली आहे. पूर्वी महिलांचे केस गळत होते, मात्र हल्ली पुरुषांचे सुद्धा केस गळू लागले आहेत. पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. खाण्यापिण्यात होत असलेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक समस्या जाणवू लागतात.
चुकीची जीवनशैली, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट वापरणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर केस गळणे, पचनक्रिया बिघडणे, सतत आजारी पडणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. केसांच्या उत्तम वाढीसाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार घेतल्यामुळे केसांची वाढ आतून होण्यास मदत होते. तसेच केसांची गुणवत्ता सुधारते. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी हेल्दी ड्रिंक कसे तयार करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे ड्रिंक प्यायल्यामुळे केसांची वाढ मजबूत होईल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:बारीक आणि कमी वजनाने त्रस्त आहात? मग आहारात ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन, वजनात होईल वाढ
केसांना वरून पोषण देण्यापेक्षा केसांच्या वाढीसाठी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. यासाठी एक कप दही घेऊन त्यात २ चमचे सतू पावडर टाकून मिक्स करा. नंतर त्यात चिमूटभर मीठ आणि ५ ते ६ कढीपत्त्याची पाने टाकून मिक्स करा.तयार केलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ठेवून बारीक वाटून घ्या. त्या मिश्रणाचे ताक तयार होईल. तयार केलेले ड्रिंक तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या वेळी पिऊ शकता. यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: एस्ट्रोजन वाढवायला डाएटमध्ये वापरा 7 पदार्थ