Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुरुमांचे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर लावा खोबऱ्याचे तेल, रातोरात दिसेल चेहऱ्यावर चमक

दक्षिण भारतीय लोक खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जातो. खोबऱ्याच्या तेलात तयार केलेले पदार्थ चवीला आणि आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या तेलामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा मऊ आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. या तेलाचा वापर करून चेहऱ्यावर चमक येते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2024 | 11:28 AM
चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्याने होणारे फायदे

चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्याने होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

पूर्वीच्या काळापासून खोबरेल तेलाचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. खोबऱ्याचे तेल जेवण बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. खोबऱ्याच्या तेलामध्ये असलेल्या गुणधर्मांनी केसांची वाढ होण्यास मदत होते. दक्षिण भारतीय लोक खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जातो. खोबऱ्याच्या तेलात तयार केलेले पदार्थ चवीला आणि आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या तेलामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा मऊ आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. या तेलाचा वापर करून चेहऱ्यावर चमक येते.

त्वचा आणि केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा आपण बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट किंवा किंवा कोणत्याही क्रीम्स लावतो. या क्रीम्स लावल्याने चेहरा अजूनच खराब होऊन जातो. त्यामुळे त्वचेवर कोणतेही क्रीम्स लावताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थ वापरावे, जेणेकरून त्वचेवरील समस्या दूर होण्यास मदत होईल. 1 चमचा खोबरेल तेलामध्ये 12 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स आणि १ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. आज आम्ही तुम्हाला खोबऱ्याचे तेल त्वचेला लावल्याने नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्याने होणारे फायदे

खोबरेल तेलाचे फायदे:

  • खोबऱ्याच्या तेलात सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात, जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
  • पुरळ किंवा मुरुमानी भरलेल्या त्वचेवर खोबऱ्याचे तेल लावल्याने त्वचेच्या संसर्गापासून आराम मिळतो. यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी दिसते.
  • खोबऱ्याच्या तेलात असलेले फॅटी ऍसिड मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मदत करतात.

त्वचेवर खोबरेल तेल कसे लावावे:

चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याआधी चेहरा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहरा कोरड्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर दोन ते तीन थेंब खोबऱ्याचे तेल टाकून हाताने सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. जास्त वेळ चेहऱ्यावर मसाज करू नये.रात्रभर त्वचेवर तेल ठेवल्यानंतर सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमची त्वचा डाग विरहित होईल. तसेच त्वचेवर मुरुमांचे डाग निघून जातील.

हे देखील वाचा: World Brain Day 2024: जागतिक मेंदू दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि यंदाची थीम

खोबरेल तेल लावण्याचे तोटे:

  • खोबरेल तेल लावल्याने त्वचेला जसे फायदे होतात, तसेच त्वचेला तोटे सुद्धा होतात. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर तेल लावू नये. अन्यथा त्यांची त्वचा आणखीन तेलकट होऊ शकते.
  • खोबरेल तेल लावल्याने त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता असते.यामुळे चेहऱ्यावर पुरळ उठू शकते.
  • थेट चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्यापेक्षा खोबरेल तेलात कोरफड जेल मिक्स करून लावल्यास त्वचेला फायदे होतात.
 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies of coconut oil for glowing face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

मंगळागौरीच्या पूजेसाठी परफेक्ट लुक! काठपदरच्या ‘या’ सुंदर साड्यांनी सौंदर्यात पडेल भर
1

मंगळागौरीच्या पूजेसाठी परफेक्ट लुक! काठपदरच्या ‘या’ सुंदर साड्यांनी सौंदर्यात पडेल भर

National Handloom Day: भारताच्या विणकाम परंपरेचा अभिमान, रेखापासून जान्हवीपर्यंत हँडलूम साड्यांच्या प्रेमात
2

National Handloom Day: भारताच्या विणकाम परंपरेचा अभिमान, रेखापासून जान्हवीपर्यंत हँडलूम साड्यांच्या प्रेमात

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर
3

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.