
Diwali Eye Makeup Tips: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी सुरू झाली की गरब्याची धमाल सुरू होते. नवीन ड्रेस, मस्त मेकअप, ग्लिटर, गडद काजळ, मस्कारा… सगळं एकदम झकास दिसतं. पण दिवाळीच्या काही दिवसांनंतर डोळ्यांना खाज येणं, पाणी येणं, पापण्या सुजणं अशा तक्रारी घेऊन लोक डॉक्टरांकडे येतात.याला कारण असतं ते डोळ्यांवर तासनतास राहणारं मेकअप. त्यात उष्णता, धूळ, गरब्यातली धावपळ. ज्यांचे डोळे आधीपासूनच नाजूक आहेत त्यांना तर पहिल्यांदा त्रास होतो. Diwali Eye Makeup Tips:
सणाचा आनंद घेताना डोळे पण जपायचे असतील तर हे नक्की वाचा.
नवीन काजळ, आयलायनर, मस्कारा आणलाय? तर गरब्याच्या दिवशीच तो पहिल्यांदा वापरू नका. एक-दोन दिवस आधी त्याची छोटीशी टेस्ट करा. थोडं प्रॉडक्ट कानामागे किंवा हाताच्या आतल्या बाजूला लावा आणि 24 ते 48 तास बघा. लालसरपणा आला, खाज आली, सूज आली तर समजून जा, ते प्रॉडक्ट तुमच्यासाठी नाही. ते डोळ्याजवळ अजिबात लावू नका.शक्यतो सुगंध नसलेलं, अॅलर्जी कमी होणारं आणि डोळ्यांच्या डॉक्टरांनी तपासलेलं प्रॉडक्ट घ्या. कारण मेकअपमधला सुगंध आणि केमिकल यामुळे डोळ्यांना अॅलर्जी होते.
बऱ्याच जणींना खालच्या पापणीच्या आत काजळ लावायची सवय असते. दिसायला ते छान दिसतं, पण डोळ्यांसाठी ते वाईट आहे.आपल्या पापणीच्या आतल्या कडेला छोट्या ग्रंथी असतात. त्या डोळ्याला ओलावा देणारं तेल तयार करतात. तिथे काजळाचे कण साचले तर त्या ग्रंथी बंद होतात. मग पापण्यांवर गाठ येणं, सूज येणं, डोळे कोरडे पडणं असं होतं. काजळाचे कण डोळ्यात पण जाऊ शकतात.त्यापेक्षा पापणीच्या बाहेरच्या केसांच्या रेषेवर आयलायनर लावा. शक्य असेल तर लिक्विड आयलायनर वापरा. गरब्यात घाम आला की काजळ पसरून डोळ्यात जाण्याचा धोका पण असतो.
ग्लिटर दिसायला भारी दिसतं, पण त्याचा एक छोटासा कण जरी डोळ्यात गेला तरी डोळ्याच्या बाहेरच्या पडद्यावर ओरखडा येऊ शकतो. याने लगेच दुखायला लागतं आणि कधी कधी इन्फेक्शन पण होतं.म्हणून डोळ्यांसाठी बनवलेलं ग्लिटरच वापरा. क्राफ्टसाठी वापरणारं ग्लिटर डोळ्याला लावू नका. सैल पावडरचा आयशॅडो न वापरता क्रीम किंवा प्रेस्ड आयशॅडो वापरा.खोट्या पापण्या लावत असाल तर लेटेक्स नसलेला गोंद वापरा. आणि तो गोंद पापणीच्या मुळाशी लागू देऊ नका.
लेन्स लावत असाल तर एक नियम लक्षात ठेवा. मेकअप करायच्या आधी लेन्स लावा आणि मेकअप काढायच्या आधी लेन्स काढा. गरब्यात डोळे कोरडे वाटले, जळजळ झाली तर लेन्स लगेच काढून टाका.
गरब्याला जाताना मैत्रिणीचं काजळ, मस्कारा वापरणं हे खूप कॉमन आहे. पण याने डोळ्यांचं इन्फेक्शन, म्हणजे डोळे येणं, एकाकडून दुसऱ्याकडे पसरू शकतं.
प्रत्येकीने आपलं स्वतःचं प्रॉडक्ट वापरावं. काजळाची पेन्सिल वापरायच्या आधी ती नीट शार्प करा. एक लक्षात ठेवा, मस्कारा उघडल्यावर तीन महिन्यांनी बदलायचा असतो आणि लिक्विड आयलायनर सहा महिन्यांनी. प्रॉडक्ट सुकलं असेल तर त्यात पाणी किंवा थुंकी टाकून परत वापरू नका. याने बॅक्टेरिया वाढतात.
रात्री उशिरा घरी आलात तरी झोपायच्या आधी मेकअप काढल्याशिवाय झोपू नका. रात्रभर मेकअप डोळ्यांवर राहिला तर पापण्यांच्या ग्रंथी बंद होतात आणि डोळे जळजळ करतात.आधी हात स्वच्छ धुवा. मग कापसाच्या पॅडवर सुगंध नसलेला मेकअप रिमूव्हर घ्या आणि डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यापासून बाहेरच्या बाजूला हळूवार पुसा. डोळे जोरात चोळू नका. डोळ्यात धूळ किंवा ग्लिटर गेला असेल तर स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
डोळे लाल राहणे, दुखणे, उजेड सहन न होणे, धूसर दिसणे, डोळ्यातून चिकट पाणी येणे, पापण्या सुजणे असं झालं तर स्वतःहून कोणतंही ड्रॉप टाकू नका. लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा.सण साजरा करताना थोडं डोळ्यांकडे लक्ष दिलं तर सण संपल्यावर पण तुमचे डोळे छान राहतील. मेकअपसोबत डोळ्यांचं आरोग्य पण जपा.