
रश्मिका मंदानाच्या ग्लोइंग स्किनचे सिक्रेट! महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी 'हा' घरगुती उपाय ठरेल सगळ्यात प्रभावी
Beauty Secrets: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते अगदी बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री रश्मिका मंदानाने प्रसिद्ध आहे. तिने केवळ अभिनयामुळेच नाहीतर तिच्या सौंदर्याने साऱ्यांचं भुरळ घातली आहे. तिचे स्मित हास्य, नितळ त्वचा आणि फ्रेश लुक सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. तिच्या लुकची कायमच सगळीकडे मोठी चर्चा असते. कमी वेळात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून सुद्धा ओळखली जाते. तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि फ्रेशनेस पाहून सगळ्यांचं तिच्या स्किन केअरबद्दल अनेक प्रश्न पडतात. तिची त्वचा एवढी निरोगी कशी काय? असे असंख्य प्रश्न चाहत्यांना कायमच पडत असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला कायमच महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा किंवा महागड्या ट्रीटमेंट करून घेतात.(फोटो सौजन्य – pinterest)
वारंवार स्किन केअर रुटीनमध्ये बदल करणे, फेसपॅक, सीरम आणि ब्यूटी ट्रीटमेंट्स घेतल्यामुळे काहीवेळा त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करावेत. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या आईने तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय केले. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेच्या समस्या हळूहळू कमी होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
हॉटरफ्लायमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये रश्मिका मंदानाने लहानपणाच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. तिच्या आई चेहऱ्यासाठी हळद आणि चंदनचा वापर करायची. प्रत्येक भारतीय घरांमध्ये हळद आणि चंदनाचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते तर चंदन त्वचा थंड ठेवण्यास मदत करते.
लेप तयार करण्यासाठी वाटीमध्ये हळद आणि चंदन समप्रमाणात घेऊन त्यात कच्चे दूध किंवा गुलाबपाणी घालावे. तयार केलेल्या पेस्टमध्ये अजिबात गुठळ्या राहून देऊ नका. पेस्ट तयार केल्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. कोणताही लेप चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर टॉवेलने त्वचा कोरडी करून चेहऱ्यावर लेप लावावा. लेप १० मिनिटं ठेवल्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेची गुणवत्ता सुधारतील.
कस्तुरी हळदीमध्ये असलेले घटक त्वचेवरील नैसर्गिक तेज वाढवण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील डाग, मुरुमे आणि टॅनिंग कमी कमी करण्यासाठी हळदीचा वापर करावा. त्वचेमध्ये वाढलेला थकवा कमी करण्यासाठी चंदन खूप जास्त गुणकारी ठरते. चंदनाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर खूप जास्त फ्रेश आणि थंड वाटते. गुलाबपाणी त्वचेवर नॅचरल टोनरप्रमाणे काम करते. कच्च्या दुधाचा वापर केल्यास त्वचेवरील घाण स्वच्छ होते.
Ans: त्वचेच्या प्रकारानुसार मध, कोरफड किंवा ओट्स यांसारख्या घटकांचा वापर करता येतो. मात्र, कोणताही उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे.
Ans: आहारात आवळा, संत्री, पपई, डाळिंब, बदाम, अक्रोड आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळतात.
Ans: त्वचेच्या प्रकारानुसार आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सौम्य फेसपॅक वापरता येतो. त्वचेवर जळजळ किंवा खाज जाणवल्यास वापरणे थांबवावे.