
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय
जगभरात मधुमेह या गंभीर आजाराचे अनेक रुग्ण आहेत. मधुमेह झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेतली नाहीतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत जाते. रक्तातील साखर वाढल्यानंतर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवनशैली जगणे आवश्यक आहे.
मधुमेह झाल्यानंतर पोषक आणि संतुलित आहारासोबत वेळेवर औषध उपचार केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो, अन्यथा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. डब्ल्यूएचओने सांगितल्यानुसार, रक्तातील साखर वाढणे हे आरोग्यासाठी घातक आहे. मधुमेह झाल्यानंतर वेळीच औषध उपचार केल्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती पदार्थ सांगणार आहोत. हे पदार्थ नियमित खाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटातील विषारी पदार्थांमुळे बिघडेल आरोग्य
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यात दोन चमचे ॲप्पल सायडर व्हिनेगर टाकून प्यायल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहून आरोग्य सुधारते. तसेच यामध्ये असलेले गुणधर्म शरीरातील साखरेची पातळी कमी करतात. सतत गोड किंवा इतर पदार्थ खाल्यामुळे स्नायूंमध्ये जमा झालेली साखर काढून टाकण्यास मदत करते.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय
मेथी दाण्यांचा वापर मागील अनेक वर्षांपासून मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जात आहे. या दाण्यांमध्ये 4-हायड्रॉक्सीआयसोल्युटीन नावाचे अमिनो ॲसिड आढळून येते. ज्यामुळे स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास उत्तेजित करते. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचे मेथी दाणे भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर मेथी दाण्यांचे पाणी प्यावे.
चवीला कडू असलेले कारलं अनेक आजारांवर रामबाण औषध आहे. नियमित कारल्याचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कारल्यामध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे घटक आढळून येतात, जे मधुमेहावर प्रभावी आहेत. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर फळांचा रस पिण्याचा सल्ला न देता कारल्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
हे देखील वाचा: व्यायाम तर केला पण शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी खाऊ काय? ‘हे’ पदार्थ बनवतील तुमचे स्नायू दणकट
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय
अळशीच्या बियांचा वापर मधुमेह नियंत्रित करण्यासाठी केला जातो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमच्या अळशीच्या बिया टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर अळशीचे पाणी पिऊन बिया चावून खा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहून आरोग्याला सुद्धा फायदे होतील.