'White Poison' मानले जाणारे 'हे' पदार्थ शरीरात वाढवतात मधुमेह - लठ्ठपणा, भारतीयांच्या ताटातील आवडते पांढरेशुभ्र पदार्थ
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मेयोनीज खायला खूप जास्त आवडते. हा पदार्थ तेल, अंड्यातील पिवळा बलक, व्हिनेगर, मीठ आणि काही रासायनिक मसाल्यांचा करून बनवला जातो. मेयॉनीज खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.
भारतीय जेवणातील मुख्य पदार्थ म्हणजे पांढऱ्या रंगाचा भात. भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे अजिबात वाटत नाही. पण सतत भात खाल्ल्यामुळे मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते.
सकाळच्या नाश्त्यात आवर्जून ब्रेड खाल्ला जातो. पण व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी मैदा, रिफाईंड तेल आणि प्रिजर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जातो. यामुळे वजन वाढण्याची जास्त शक्यता असते.
मोमोज, चाऊमीन आणि इतर फास्ट फूडमध्ये मैद्याचा वापर केला जातो. हे पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप आवडीने खातात. मैद्यामध्ये कोणतेही पोषक घटक नसतात.
साखरेला 'व्हाईट पॉयझन' असे म्हंटले जाते. कारण साखरेचे अतिसेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यासोबतच चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि मुरूम येतात. साखर खाल्ल्यामुळे शरीरात 'इन्सुलिन रेझिस्टन्स' निर्माण होतात.