केसांमधील कोरडेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
सर्वच ऋतूंमध्ये केसांसंबधित समस्या उद्भवतात. त्यामुळे केसांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषता हिवाळ्यामध्ये त्वचा आणि केस कोरडे होऊन जातात. कोरडे आणि रुक्ष झालेले केस कितीही स्वच्छ केले आणि कितीही केसांची चांगली निगा राखली तरीसुद्धा केस कोरडे होतात. शिवाय थंडीमध्ये केसात कोंडा होतो. कोंडा झाल्यानंतर केसांना सतत खाज येणे, टाळू अस्वच्छ दिसू लागते. अशावेळी अनेक महिला केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांना फायदे होतात, मात्र कालांतराने केस पुन्हा एकदा रुक्ष आणि कोरडे होऊन जातात. कोरडे झालेले केस कितीही व्यवस्थित विंचरले तरीसुद्धा ते व्यवस्थित दिसत नाहीत.(फोटो सौजन्य-istock)
लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा
कोरड्या केसांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. घरगुती उपाय केल्यामुळे केसांमधील नैसर्गिक चमक टिकून राहते, ज्यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही. आज आम्ही तुम्हाला कोरड्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी भेंडीचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा
भेंडी हेअर मास्क लावण्याआधी केसांमधील गुंता काढून घ्या. त्यानंतर तयार केलेला मास्क केसांच्या टोकांपासून ते मुळांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावा. हेअर मास्क व्यवस्थित केसांना लावून झाल्यानंतर दोन ते तीन तास केस तसेच ठेवून घ्या. यामुळे केस मऊ आणि सिल्की होण्यास मदत होईल. त्यानंतर दोन तासांनी केस शॅम्पूचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमचे केस मऊ आणि सिल्की होण्यास मदत होईल. तांदळाच्या पिठात असलेले गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यासाठी मदत करतील. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास केसांमधील कोंडा कायमचा निघून जाईल आणि केस स्वच्छ होतील.