किडलेले दात आणि दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
लहान मुलांसह मोठ्यांना चॉकलेट आणि इतर गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मात्र नेहमी नेहमी चॉकलेट खाल्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची शक्यता असते. दातांमध्ये कीड लागल्यानंतर हळूहळू सगळे दात खराब होऊ लागतात. ज्यामुळे दातांमध्ये वेदना होणे, दात किंवा हिरड्या दुखणे, दात पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर दात स्वच्छ न केल्यामुळे दातांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा थर साचून राहण्यास सुरुवात होते. ज्यामुळे हसताना किंवा बोलताना अनेकदा लाजिरवण्यासारखे वाटते. दातांमध्ये वेदना किंवा सूज आल्यानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार केले जातात. मात्र दातांमध्ये कीड लागल्यास किंवा दात पिवळे झाल्यास तुम्ही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया.
दातांवर लागलेली कीड आणि पिवळेपणा कमी करण्यासाठी मिठाचा वापर करावा. मिठाच्या पाण्यात असलेले गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. याशिवाय मिठामध्ये असलेले घटक दातांमध्ये लागलेली कीड कायमची नष्ट करून टाकतात. यासाठी पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. गुळण्या केल्यामुळे दात स्वच्छ होतील आणि चमकदार दिसतील. हिरड्या आणि तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करावा.
तोंडातून येणारी दुर्गंधी आणि कीड कमी करण्यासाठी लसणीचा वापर करावा. लसणीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. लसूण वाटून पेस्ट तयार करा आणि हिरड्या आणि दातांवर व्यवस्थित चोळून घ्या. याशिवाय कीड ल;लागलेल्या ठिकाणी काहीवेळ लसूण भरून ठेवा. यामुळे दातांमधील कीड नष्ट होईल आणि दात स्वच्छ दिसतील. तसेच लसूण चावून खाल्यास दातांवरील कीड कमी होईल.
तळपायाच्या भेगा कमी होत नसल्यास करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, पाय होतील मुलायम आणि सुंदर
मसाल्यातील पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लवंग. लवंगचा वापर जेवण बनवताना केला जातो. याशिवाय दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर लवंग तेलाचा वापर करून आराम मिळवावा. यामध्ये वेदनाशामक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळून येतात, जे दातांमधील पोकळी कमी करतात. दातांसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सर्वप्रथम कापसाचा गोळा घेऊन लवंग तेलात बुडवा. त्यानंतर दत्तनवर सगळीकडे फिरवून कीड लागलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे तुमचे दात स्वच्छ होतील.