कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी घरगुती उपाय
शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृयद्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. यामुळे शरीराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. शरीरात वाढलेले चांगले कोलेस्ट्रॉल निरोगी पेशी तयार करण्यासाठी मदत करतो तर वाईट कोलेस्ट्रॉल हृद्यासह आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. शरीरात वाढलेल्या अतिकोलेस्टरॉलमुळे हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
‘या’ लोकांनी दैनंदिन आहारात चुकूनही करू नका तुपाचे सेवन! आरोग्यासाठी ठरेल विष, जाणून घ्या दुष्परिणाम
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार न केल्यामुळे आरोग्य बिघडू शकते. दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, अतिप्रमाणात मद्य सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार वाढू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा रस प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात तेलकट तिखट पदार्थांचे सेवन न करता पौष्टिक आणि पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते. दैनंदिन आहारात ग्रीन टी, ओट ड्रिंक्स आणि प्लांट मिल्क स्मुदी इत्यादी ड्रिंक्सचे सेवन करावे. यामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोजच्या आहारात आवळा आणि गाजरच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील. रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते, तर गाजरमध्ये बीटा – कॅरोटीन अ आढळून येते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि शरीराला फायदे होतात.
NIH च्या अहवालानुसार सकाळी उपाशीपोटी लसूण आणि मधाचे सेवन वेट लॉससाठी फायदेशीर, कसे जाणून घ्या
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आवळा आणि गाजरचे तुकडे टाकून त्यात मध आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर तयार करून घेतलेला रस गाळून घ्या आणि पिण्यासाठी सर्व्ह करा. हा रस नियमित प्यायल्यास शरीरातील सर्व घाण स्वच्छ होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. या रसाच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता दूर होते.