डॉक्टराचा डायबिटीस बरा केल्याचा रामदेव बाबांचा दावा (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
सध्या जगभरात सर्वात जास्त दिसून येणारा आजार म्हणजे डायबिटीस. मधुमेहाला गोड पदार्थांचा आजार म्हणतात. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे इतर अवयव हळूहळू खराब होऊ लागतात. डायबिटीस हा एक सायलंट किलर आहे, ज्यामुळे हृदयरोग, कर्करोग, किडनी निकामी होणे, दृष्टी अंधुक होऊ शकते आणि याबाबात रुग्णाला कळूनही येत नाही.
साखरेचे प्रमाण वाढल्याने दैनंदिन जीवनात अनेक समस्या उद्भवतात. खूप तहान लागणे, रात्री वारंवार लघवी होणे, दृष्टी कमकुवत होणे, जास्त भूक लागणे, जास्त थकवा येणे आणि संसर्गाचा धोका वाढतो. म्हणून, साखरेपासून मुक्त होणे खूप महत्वाचे आहे.
विज्ञानाचा असा विश्वास आहे की मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण बाबा रामदेव यांनी एका व्हिडिओमध्ये दावा केला आहे की त्यांनी एका MBBS डॉक्टरचा मधुमेह बरा केला आहे, ज्याला इन्सुलिनदेखील घ्यावे लागले होते. या उपचारासाठी त्यांनी कोणती पद्धत सांगितली आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
काय सांगतात बाबा रामदेव
बाबा रामदेव म्हणाले की, योग आणि आयुर्वेदाला विरोध करणारे डॉक्टर राजसिक किंवा तामसिक स्वभावाचे असले पाहिजेत. सात्विक स्वभावाचे डॉक्टर योगाचे भक्त असतात. त्यांनी एमबीबीएस-एमएस डॉक्टर BR अहलावत यांच्याबद्दल सांगितले ज्यांनी ५० हजारांहून अधिक प्रसूती केल्या आहेत आणि त्यांचा डायबिटीस कसा बरा केला याबाबतही सांगितले.
डायबिटीस रूग्णांनी वाचाच, केवळ गोडच नाही तर ‘या’ पदार्थांनीही वाढते ब्लड शुगर पातळी
डॉक्टरांना शुगरचा आजार
डायबिटीसवरील रामदेव बाबांचा उपाय
डॉक्टरांनी रामदेव बाबा यांना आपल्या डायबिटीसबाबत सांगितले आणि यावर बाबा रामदेव म्हणाले की आजपासून काहीही होणार नाही, आजपासून तुम्ही योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचाराच्या मदतीने १०० वर्षे जगाल. याच्या मदतीने त्याची साखर आणि इन्सुलिन घेणेदेखील थांबले असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा यांनी केला आहे.
डॉक्टर आणि रामदेव बाबांची भेट
आयुर्वेदिक उपाय
गुळवेल आणि अन्य आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग
आयुर्वेदाने मधुमेहावरील सर्वोत्तम उपचारांचे वर्णन केले आहे. त्यांच्या मागील एका रीलमध्ये रामदेव म्हणाले होते की कोरफड, चिरैता, गुडमार, कुटकी, विजयसर, गुळवेलामध्ये रक्तातील ग्लुकोज कमी करण्याची क्षमता आहे. त्यांचे सेवन करत राहिले पाहिजे आणि यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहत नाही तर तो नष्ट होतो असा दावाही त्यांनी केला आहे.
योगगुरू रामदेव बाबा यांनी मधुमेहासाठी फायदेशीर असलेल्या ज्यूसबद्दलही सांगितले. ते म्हणाले की काकडी, टोमॅटो आणि कारल्याचा ज्यूस दररोज बनवून सेवन करावा. यामुळे साखर वाढणार नाही आणि दिवसभर ती नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याचे सेवन डायबिटीसला तुमच्या आजूबाजूलाही फिरकू देणार नाही.
शरीरातील कोणकोणत्या भागांवर दिसतात डायबिटीसची लक्षणं? प्रत्येकाने जाणून घेणे महत्वाचे
कशी कमी करावी रक्तातील साखर?
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.