अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोक मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त आहेत. मधुमेहात साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांना साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधे आणि विशेष आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी फक्त साखर खाणे त्रासदायक आहे असं अनेकांना वाटतं. पण असं अजिबात नाही. केवळ साखर अथवा गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते असं नाही तर अन्य असे काही पदार्थ आहेत जे त्रासदायक ठरतात. हे कोणते ते जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
ब्लड शुगरची पातळी वाढल्याने डायबिटीस रुग्णांना अधिक त्रास होतो. अनेकांना साखरेमुळे ब्लड शुगर वाढते असं वाटतं. मात्र अन्य पदार्थही याला कारणीभूत आहेत, ते जाणून घेऊया
मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. जर तुमच्या खाण्याच्या सवयी वाईट असतील तर शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढेल. जंक फूडचे जास्त सेवन केल्याने मधुमेहाचा धोकादेखील वाढू शकतो
फास्ट फूड, पॅक केलेले स्नॅक्स आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. जर तुम्ही साखर किंवा गोड पदार्थ सोडले असतील पण तुम्ही फास्ट फूड आणि पॅकेज्ड स्नॅक्स जास्त प्रमाणात खात असाल तर तुमच्या साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते
एकाच ठिकाणी बराच वेळ बसून व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. एकाच ठिकाणी बसल्याने मधुमेही रुग्णाची साखरेची पातळी झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत, फेरफटका मारा आणि जास्त वेळ एकाच जागी बसू नका
सततच्या ताणतणावामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वेगाने वाढते. तणाव कमी करण्यासाठी, दररोज उद्यानात जा आणि किमान 30 मिनिटे चालत जा
डायबिटीसची पातळी वाढत आहे की नाही याची नियमित चाचणी करून घ्यावी. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे आणि डॉक्टरांनाही भेट द्यावी