Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठवडाभरात होईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात! नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 01:19 PM
आठवडाभरात होईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात! नियमित खा 'हे' पौष्टिक पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

आठवडाभरात होईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात! नियमित खा 'हे' पौष्टिक पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Close
Follow Us:

मधुमेह होण्याची कारणे?
रक्तात साखर वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे?

जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. रक्तातील साखर वाढल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. पण या बदलांकडे व्यवस्थित ल;लक्ष दिले जात नाही. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत जाते. अशावेळी आहाराकडे व्यवस्थित लक्ष देणे फार गरजेचे आहे. दैनंदिन आहारात कमी ग्लायसेमिक आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील. पण अनेकांना सतत गोड पदार्थ किंवा कोणत्याही वेळी जेवण्याची सवय असते. याच चुकीच्या सवयी शरीराचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे, अचानक चक्कर येणे, अंगाला खाज येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

मधुमेहासाठी भेंडी प्रभावी:

रक्तात वाढलेल्या साखरेमुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजार उद्भवतात. काहीवेळा जखमा झाल्यानंतर त्या बऱ्या न झाल्यास शरीरातील अवयव काढून टाकावे लागतात. त्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आहारात नियमित भेंडीची भाजी खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहील. भेंडीच्या भाजीमध्ये असलेले विरघळणारे फायबर आतड्यांमध्ये साखरेचे शोषण कमी करते. यासोबतच पालेभाज्या आणि इतर भाज्यांचे सेवन करावे.

अ‍ॅव्होकॅडो:

देशातील प्रत्येक व्यक्ती आता अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करू लागली आहे. या पदार्थाला स्वतःची अशी वेगळी चव नसते. त्यामुळे अ‍ॅव्होकॅडो पासून पदार्थ बनवताना त्यात कांदा, टोमॅटो आणि इतर मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात करावा. यामुळे अ‍ॅव्होकॅडोची चव वाढते. अ‍ॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. रक्तातील साखरेच्या जलद वाढीस प्रतिबंध करण्यासाठी अ‍ॅव्होकॅडो खाण्याचा सल्ला दिला जातो. सॅलड, स्मूदी किंवा नाश्त तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता.

फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते! IIT मुंबईच्या संशोधनातून उलगडला ‘म्युकस पॅराडॉक्स’

मशरूम:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मशरूम उपलब्ध असतात. मशरूममध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी आढळून येतात. यासोबतच मी,मशरूमध्ये फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स इतर अनेक घटक आढळून येतात. मशरूममध्ये असलेले घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि आरोग्य सुधारतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी मशरूमपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Blood sugar levels will be under control within a week eat these nutritious foods regularly the body will get immense benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • diabetes
  • home remedies for Diabetes
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

IMCR चा धक्कादायक अहवाल, देशात 100000000 डायबिटीस रुग्ण; 8-16 वयातच होत आहे मृत्यू; तज्ज्ञांनी दिला इशारा
1

IMCR चा धक्कादायक अहवाल, देशात 100000000 डायबिटीस रुग्ण; 8-16 वयातच होत आहे मृत्यू; तज्ज्ञांनी दिला इशारा

Jaggery: साखरेऐवजी मध-गूळ आहे उत्तम पर्याय? खरंच Diabetes रूग्ण खाऊ शकतात का, तज्ज्ञांचा सल्ला
2

Jaggery: साखरेऐवजी मध-गूळ आहे उत्तम पर्याय? खरंच Diabetes रूग्ण खाऊ शकतात का, तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.