फोटो सौजन्य - Social Media
दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट लोकांना पाण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे आहे. यावर्षीच्या जागतिक जल दिनाची संकल्पना “हिमनद संरक्षण” ही आहे, जी गोड्या पाण्याच्या पुरवठ्यात हिमनदांची भूमिका आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संवर्धनाच्या गरजेवर भर देते.
शहरांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) फिल्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेकांना वाटते की RO फिल्टरचे पाणी आरोग्यासाठी सुरक्षित असते, परंतु ते पूर्णतः निरोगी नसून त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. नळाचे पाणी अनेकदा पिण्यायोग्य नसते, म्हणून RO चा वापर केला जातो. मात्र, RO प्रक्रिया पाण्यातील महत्त्वपूर्ण खनिजेही काढून टाकते, ज्यामुळे शरीराला पोषणदृष्ट्या अपुरे पाणी मिळते. RO पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी जीवनावश्यक खनिजेही नष्ट होतात, ज्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
RO पाणी खनिजमुक्त असते, त्यामुळे ते नियमित प्यायल्याने शरीरातील खनिजांची कमतरता हृदयविकारास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, छातीत वेदना आणि रक्ताभिसरणाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. RO पाणी लोह (Iron) कमी करते, त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. तसेच, RO पाणी घेतल्यास व्हिटॅमिन B12 ची कमतरता होऊ शकते, ज्याचा परिणाम रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीवर होतो. यामुळे थकवा, चक्कर येणे, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्या होऊ शकतात.
RO पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी पोषक घटक महत्त्वाचे असतात. RO पाणी सतत प्यायल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर उकळलेले आणि नैसर्गिक खनिजयुक्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) RO पाण्याच्या अतिवापराबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार, RO पाण्याच्या दीर्घकालीन सेवनाने शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञ RO पाणी घेतल्यानंतर ते उकळून किंवा मिनरल्स अॅड करून पिण्याचा सल्ला देतात.