जाणून घ्या फेसवॉश करण्याची 'ही' आहे योग्य पद्धत
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. चेहऱ्यावर कधी फेशिअल करणे तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे फेसवॉश वापरले जातात. मात्र त्वचेचा प्रकार समजून न घेता महागड्या केमिकल युक्त फेसवॉश किंवा क्रिम्सचा वापर केल्यास त्वचेवर पिंपल्स किंवा पुरळ येण्यास सुरुवात होते. त्वचेवर आलेले पिंपल्स आणि इतर समस्या त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता अतिशय वाईट होऊन जाते. त्यामुळे त्वचेची काळजी योग्य प्रकारे घ्यावी. त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी त्वचेला आतून पोषण देणे आवश्यक आहे. आहारात विटामिन सी युक्त पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
Ice facial म्हणजे काय? जाणून आइस फेशिअल करण्याची पद्धत आणि त्वचेला होणारे अद्भुत फायदे
धूळ, माती, प्रदूषणामुळे खराब झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी महिला फेसवॉशचा वापर करतात. मात्र त्वचेला सूट न होणाऱ्या फेसवॉशचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक खराब होऊन जाते. काही महिला दिवसभरातून पाच ते सहा वेळा फेसवॉशचा वापर करून त्वचा पाण्याने स्वच्छ करतात. मात्र असे केल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन चेहरा कोरडा आणि निस्तेज दिसू लागतो. योग्य पद्धतीने त्वचा स्वच्छ न केल्यामुळे पिंपल्स आणि पुरळ येऊन त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवसभरातून चेहरा कितीवेळा स्वच्छ करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दिवसभरातून चेहरा फक्त फेसवॉश वापरून स्वच्छ करावा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करावी. यामुळे त्वचेला इजा होत नाही. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून त्वचेला सूट होईल असे कोणतेही प्रॉडक्ट लावल्यास ते त्वचेमध्ये व्यवस्थित मुरतात. प्रॉडक्टचा त्वचेला फायदा होऊ लागतो. त्यानंतर रात्री त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारण दिवसभर चेहऱ्यावर केलेला मेकअप, धूळ, मातीचे कण स्वच्छ झाले नाहीतर ते त्वचेमध्ये तसेच साचून राहतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र दिवसभरात धूळ मातीमुळे त्वचा तेलकट किंवा चिकट झाल्यास तुम्ही तो स्वच्छ धुवू शकता.
चाळिशीतही त्वचेवर दिसून येणार नाही वृद्धत्व, Young Skin साठी ‘या’ बॉडी स्क्रबचा वापर करा