'या' पद्धतीने करा आइस फेशिअल?
त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल केले जाते, तर कधी घरगुती पदार्थांचा वापर करून वेगवेगळे फेसपॅक किंवा फेस स्क्रब तयार करून लावले जातात. त्वचेवर प्रामुख्याने नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता कायम टिकून राहील. याशिवाय त्वचेला पोषण देण्यासाठी आहारात पौष्टिक आणि विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग कमी होण्यास मदत होईल. सर्वच महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्वचेवर बर्फ फिरवतात. तर काही महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी आइस फेशिअल केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
चाळिशीतही त्वचेवर दिसून येणार नाही वृद्धत्व, Young Skin साठी ‘या’ बॉडी स्क्रबचा वापर करा
त्वचेवर साचून राहिलेली घाण, धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येत्रो. याशिवाय त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. त्वचेवर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचा काळवंडून जाते आणि काळपट दिसू लागते. त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी महिला फेशिअल करतात. अशावेळी तुम्ही आइस फेशिअल करू शकता. आज आम्ही तुम्हाला आइस फेशिअल म्हणजे काय? आइस फेशिअल कधी करावे? आइस फेशिअल केल्यामुळे त्वचेला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी आइस फेशिअल केले जाते. यासाठी बर्फाचा वापर केला जातो. त्वचेवर बर्फ फिरवून त्वचा स्वच्छ आणि फ्रेश केली जाते. आइस फेशिअल केल्यानंतर त्वचेवर साचून राहिलेली घाण, धूळ स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेच्या ओपन पोर्समध्ये साचून राहिलेली अतिरिक्त घाण स्वच्छ करण्यासाठी आइस फेशिअल करावे. यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते.
‘या’ पद्धतीने करा आइस फेशिअल?
आइस फेशिअल करताना सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्या. त्यानंतर बर्फाच्या पाण्यात 10 ते 15 मिनिटं त्वचा बर्फाच्या पाण्यात बिडवून ठेवा. ज्यामुळे त्वचेवर बर्फ व्यवस्थित लागेल. त्यानंतर त्वचा कॉटनच्या कापडाने त्वचा हलक्या हाताने पुसून घ्या. यामुळे त्वचा व्यवस्थित ड्राय होईल आणि त्वचेची घाण स्वच्छ होईल. त्यानंतर त्वचेला सूट होईल असे मॉइश्चरायजर व्यवस्थित त्वचेवर लावा. त्यानंतर पुन्हा एकदा त्वचा बर्फाच्या पाण्यात बिडवून नंतर टॉवेलने पुसून घ्या.
J Beauty VS K Beauty: कोरियन की जपानी? तुमच्यासाठी कोणता स्किन केअर रूटीन आहे बेस्ट, जाणून घ्या
त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी आइस फेशिअल करावे. यामुळे त्वचा स्वच्छ होते. बर्फाचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचा एक्सफॉलिएट होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. याशिवाय आइस फेशिअल केल्यामुळे त्वचेचे रक्तभिसरण वाढते आणि त्वचा सुधारते. स्कीन डिटॉक्ससाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आइस फेशिअल करावे. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स स्वच्छ करण्यासाठी आइस फेशिअल करावे. तसेच चेहऱ्यावर आलेली सूज कमी होते.