फोटो सौजन्य: iStock
आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यास कोणास नाही आवडत. खरंतर कधी तो पदार्थ बनतोय आणि गरमागरम खायला मिळतोय. अशी प्रत्येकाची स्थिती होते. पण अनेकदा घाईगडबडीच्या नादात आपण तो पदार्थ एवढ्या लवकर खातो की आपली जीभच भाजून जाते. पण हे फक्त आपल्या आवडत्या पदार्थांच्या बाबतीत होते असे नाही. बऱ्याचदा गरम चहा, कॉफी, रोटी किंवा इतर कोणतेही पदार्थ खाताना जीभ जळते, ज्यामुळे आपल्याला पदार्थांची चवच चाखायला मिळत नाही.
जीभ भाजल्यानंतर, बऱ्याच वेळा जळजळीमुळे जिभेवर फोड देखील येतात. ज्यामुळे खाणे-पिणे कठीण होते. जर तुमची जीभ गरम अन्नामुळे जळली असेल आणि तुम्हाला अन्नाची चव लागत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही यातून लवकर आराम मिळवू शकता.
जीभ जळल्यानंतर पहिला आणि सोपा उपाय म्हणजे ताबडतोब थंड पाणी पिणे. यामुळे जळजळ कमी होऊ शकते. तसेच प्रभावित भागात थंडावा देखील मिळतो. यामुळे लवकर आराम मिळू शकतो आणि तुम्ही अन्नाची चव देखील परत मिळू शकते.
जिभेवर बर्फाचा तुकडा किंवा थंड दूध लावल्याने जळजळ कमी होते. तुम्ही आईस्क्रीम किंवा थंड दही देखील खाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
मधात नैसर्गिक गुणधर्म असतात. जे जळजळ झाल्यास जिभेवरील सूज कमी करते. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
तुमच्या जिभेवर एक छोटा चमचा साखर किंवा साखरेची कँडी ठेवा आणि ते हळूहळू खावा. यामुळे जळजळ कमी होण्यास आणि चव परत येण्यास मदत होते.
कोरफडीमध्ये थंडावा देणारे आणि उपचार करणारे गुणधर्म आहेत. तुम्ही जिभेवर ताजे कोरफडीचे जेल लावू शकता, यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल.
कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून गुळण्या केल्याने जळजळ कमी होते आणि संसर्गाचा धोका देखील कमी होतो.
पालकांनो! लहान मुलांच्या समोर चुकूनही करू नका ‘ही’ कामे; मानसिकतेवर होतो परिणाम
कॅमोमाइल किंवा ग्रीन टी सारख्या थंड हर्बल टीमुळे जिभेची जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच जळजळ देखील कमी होते.
जीभ पूर्णपणे बरी होईपर्यंत मसालेदार, गरम आणि आंबट पदार्थ टाळा. यामुळे जळजळ वाढू शकते.