फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येक आई वडील आपल्या पाल्याला योग्य संस्कार देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. पण कधी कधी नकळत घडलेल्या चुका लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करतात. त्यांना त्या चुका पाहण्याची सवय लागली तर त्या चुका ते स्वतः करू लागतात. ‘जे ते पाहणार तसे ते शिकणार’ अशी शक्यतो लहान मुलांची मानसिकता असते.
यामुळे त्या चुका आपल्याला चुका वाटत असल्या तरी आपल्या चुकीच्या कृत्यांमुळेच ते लहान जीव हे कृत्य करू लागतं. त्यामुळे लहान मुलांसमोर योग्य पद्धतीने वागणे गरजेचे असते. आपल्या कृत्यांचा त्यांच्या इवल्याशा मनावर काही वाईट परिणाम होत नाही ना? यावर लक्ष असणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात, आपल्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या कोणत्या चुका आपल्याकडून नकळत घडतात?
लहान मुलांसमोर खोटं बोलणे अगदोर टाळा. आपण नेहमी आपल्या पाल्यांना सांगत असतो की ‘बाळ, खोटं बोलणे चुकीचे असते.’ पण आपण स्वतः खोटे बोलणे काही कमी करत नाही. निदान तुमच्या मुलांसमोर तरी नेहमी खरे बोला. लहान मुलांसमोर कधीच कोणत्याही प्रकारचा नशा करणे टाळा. त्यांच्या समोर धूम्रपान नका करत जाऊ तसेच मद्यपानही टाळा. नजरेसमोर असे घडल्याने लहान मुले तशी कृती करू लागतात. नक्कल करू लागतात. लहान मुलांसमोर शिव्याही देऊ नका. अपशब्दांचा उच्चार टाळा. काही लहान मुले तर मोठ्यांचं ऐकून शिव्याही शिकू लागतात.
लहान मुलांसमोर कुणाला कधी वाईट-साईट बोलू नका. कधी कुणाला शिव्या-शाप देऊ नका. याचा परिणाम लहान मुलांच्या बुद्धिमत्तेवर होतो. ते ही तसेच वागू लागतात. शुल्लक कारणाने झालेल्या वादाला समोरच्याला शिव्या शाप देऊ लागतात. भांडण होणे सामान्य आहे पण अशामध्ये आपला पाल्याच्या उपस्थित अशा परिस्थिती स्वतःला Control करत चला. याने त्यांना ही काही तरी शिकण्यास मिळेल. शेवटी आपला पाल्य ही आपली सावली आहे आणि आपण तिला योग्य तो आकार दिला पाहिजे.