
खरी बनारसी साडी कशी ओळखाल
भारतातील प्रसिद्ध साड्यांमध्ये बनारसी सिल्क साडीची स्वतःची ओळख आहे. जीआय टॅग असलेली ही साडी जगभरात पसंत केली जाते. या साड्यांचे रंग, डिझाइन आणि फॅब्रिक पाहून लोक प्रभावित होतात. पण हल्ली अनेक दुकानांमध्येही बनावट बनारसी साड्या विकल्या जात आहेत आणि अनेक ग्राहकांना याबाबत माहीतही नसते.
यामुळे, खऱ्या आणि बनावट बनारसी साड्यांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. अनेक दुकानदार बनावट बनारसी साड्या खूप जास्त किमतीत विकून ग्राहकांना फसवतात. म्हणून, काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात ज्याच्या मदतीने तुम्ही शुद्ध बनारसी सिल्क साडी ओळखू शकता आणि बाजारात फसवणूक होण्यापासून देखील वाचू शकता. यासाठी तुम्ही हा लेख वाचायलाच हवा (फोटो सौजन्य – Instagram)
धाग्याचा पॅटर्न
बनारसी साडी ओखळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती कशी विणली आहे हे समजून घेणे. कारण मूळ बनारसी साडी विणण्याचे काम नेहमीच आडव्या दिशेने केले जाते. म्हणून जर साडी शुद्ध बनारसी सिल्कपासून बनलेली असेल तर तिच्या धाग्यांची रचना नेहमीच आडवी असेल. मध्यभागी कुठेही तुम्हाला उभ्या दिशेने धागे दिसणार नाहीत.
काठापदराच्या साडीचे काठ लगेच काळे पडतात? मग ‘या’ चुका करणे टाळा, साडी राहील अनेक वर्ष नव्यासारखी सुंदर
साडीच्या बॉर्डरवरील खुणा
बनारसी सिल्क साडी विणताना, ती घट्ट ठेवण्यासाठी तिच्या कडा अर्थात बॉर्डर्स खिळ्यांनी चिकटवल्या जातात. डिझाइन खराब होऊ नये आणि धागे घट्ट राहावेत यासाठी हे केले जाते. म्हणून, बनारसी सिल्क साडी खरेदी करण्यापूर्वी, साडीच्या काठावर पिनचे चिन्ह पहा. यामुळे तुम्हाला पटकन बनारसी साडी असल्याचे कळून येईल
बनारसी सिल्क साड्या हाताने विणलेल्या असतात. म्हणूनच या साडीच्या सुरुवातीला थोडा धागा सैल राहतो. तर बनावट बनारसी साडी यंत्राने बनवली जाते. त्यामुळे त्याच्या सुरुवातीच्या काठावर धागे सैल होत नाहीत.
धागा जाळून पहा
शुद्ध बनारसी रेशमी साडी बनवण्यासाठी, रेशमी किड्याच्या कोशाच्या तंतूंपासून धागा बनवला जातो, ज्याने साडी विणली जाते. जर तुम्ही हा धागा जाळण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच जळेल आणि तुमचा हात काळे होईल. तर बनावट बनारसी साड्यांसाठी प्लास्टिक किंवा कृत्रिम धागे वापरले जातात. म्हणूनच जेव्हा ते जाळले जातात तेव्हा ते प्लास्टिकसारखे चिकटतात. रेशीम अत्यंत नाजूक असते आणि ते कधीही प्लास्टिकसारखे दिसत नाही
साडीची किंमत
अस्सल बनारसी सिल्क साडीची किंमत किमान 10-12 हजार रुपये इतकी असते. जर कोणी तुम्हाला बनारसी सिल्क साडी यापेक्षा कमी किमतीत विकत असेल तर ती बनावट असू शकते. तुम्ही सध्या घेत असलेल्या बनारसी साड्या या नक्कीच बनावट असू शकतात. कारण रेशम आणि ती विणण्याची कला यामुळे ही साडी अत्यंत महागडी ठरते
लग्नसमारंभात परिधान करा ‘या’ साऊथ स्टाईल साड्या, दिसाल लग्नामध्ये इतरांपेक्षा आकर्षक
बनारसी साडीची चमक
बनारसी सिल्क साड्या खऱ्या रेशमापासून बनवल्या जातात ज्याची चमक कृत्रिम धाग्यांपेक्षा खूप वेगळी असते आणि स्पर्शाला खूप मऊ असते. रेशमाच्या धाग्यांनी विणलेली असल्यामुळे बनारसी साडी अत्यंत चमकदार आणि रॉयल दिसते. या साडीचे रंग आणि डिझाईन दोन्ही डोळ्यात भरतात आणि सुंदर दिसतात. बाजारात बनावट बनारसी सिल्क साड्या विकत असलेले बरेच लोक आहेत. म्हणून, बनारसी सिल्क खरेदी करताना नेहमी विश्वासू दुकानदाराकडे जा.
या छोट्या छोट्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही बनारसी सिल्क साडीची खरी ओळख करू शकता. जर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील तर कोणताही दुकानदार तुम्हाला बनारसी साडीच्या नावाखाली फसवू शकणार नाही.